नवी दिल्ली : ‘टाइम्स ग्रुप’च्या चेअरपर्सन इंदू जैन यांचं गुरुवारी रात्री दिल्लीत निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या देशातील यशस्वी बिझनेसवुमन होत्या. त्यांना ‘पद्म भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
भारतात स्पुटनिक – व्ही लसीचा पहिला डोस दिला, लसीच्या किंमतीची झाली घोषणा https://t.co/uEZOmarVcL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021
देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या मीडिया संस्थांपैकी एक असलेल्या ‘टाइम्स ग्रुप’च्या चेअरपर्सन इंदू जैन यांचं निधन झालं. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीत काल गुरुवारी (13) रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 84 वर्षांच्या होत्या.
#InduJain https://t.co/jPSl48mGcC
— Ruchi Dwivedi (@dwi_ruchi) May 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मीडिया संस्था आणि कामाप्रती असलेल्या असीम निष्ठेमुळेच इंदू जैन अनेक महिलांसाठी आदर्शवत होत्या. भारत सरकारने 2016 मध्ये त्यांना ‘पद्म भूषण’ या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. कला आणि संस्कृतीमध्ये विशेष रस असलेल्या इंदू जैन भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष देखील होत्या. याशिवाय त्यांनी महिलांच्या अधिकारांबाबतही आवाज बुलंद केला होता. त्यांना अनेकांनी ट्वीट करुन श्रद्धांजली वाहिली.
Deepest condolences to the entire Times Group family @timesofindia, on the loss of their guiding light Smt. Indu Jain ji.
She touched so many lives in her own distinct manner. May her soul rest in peace. 🙏🏼
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 13, 2021
मूळच्या उत्तर प्रदेशातील फैजाबादमधील असलेल्या इंदू जैन यांचा विवाह ‘टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप’च्या अशोक कुमार जैन यांच्याशी झाला होता. 1999 मध्ये अशोक जैन यांचं निधन झालं होतं. अनेकदा फोर्ब्जच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या इंदू जैन या FICCI महिला संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष देखील होत्या.
Saddened by the demise of Times Group Chairperson Smt. Indu Jain Ji. She will be remembered for her community service initiatives, passion towards India’s progress and deep-rooted interest in our culture. I recall my interactions with her. Condolences to her family. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2021
इंदू जैन यांनी वाढत्या वयाची चिंता न करता कायम कामाला महत्त्व दिलं. त्या देशातील यशस्वी बिझनेसवुमन होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदू जैन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. समाजासाठी दिलेल्या योगदानासाठी इंदू जैन कायम स्मरणात राहतील, असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
कोरोना कॉलर ट्यूनवरून उच्च न्यायालय भडकलं; म्हणे….हा संदेश 10 वर्षे चालवाल https://t.co/tY29DckEst
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 14, 2021