Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरावर केला चाकू हल्ला; डॉक्टरामधून तीव्र संताप, तीव्र निषेध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारीमहाराष्ट्र

रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरावर केला चाकू हल्ला; डॉक्टरामधून तीव्र संताप, तीव्र निषेध

Surajya Digital
Last updated: 2020/07/29 at 8:25 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

लातूर : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत असून, या रुग्णालयात आज सकाळी एका रुग्णाच्या नातेवाइकानं डॉक्टरांवर चाकूनं हल्ला केला. सुदैवानं या हल्ल्यातून डॉक्टर बचावले. त्यांच्यावर उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळं तीव्र संताप व्यक्त होत असून, लातूरमधील संघटनेनं या घटनेचा निषेध केला आहे.

डॉ. दिनेश वर्मा असं डॉक्टरांचं नाव आहे. या प्राणघातक हल्ल्यातून ते बचावले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे. अशावेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही सहकार्य करायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लातूरमधील अल्फा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात एका रुग्णाच्या नातेवाइकानं बुधवारी करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर चाकू हल्ला केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध

गेल्या चार दिवसांपासून रुग्ण या रुग्णालयात दाखल होता. ते वयोवृद्ध होते. त्यात त्यांना मधुमेहाचा त्रास होता. रुग्णाची प्रकृती गंभीर होती हे नातेवाइकांना माहीत होते. मात्र, रुग्ण दगावल्यानंतरही त्याच्या एका नातेवाइकानं डॉ. वर्मा यांच्यावर चाकूने हल्ला केला. सध्याच्या कठीण प्रसंगातही डॉक्टर हे रुग्णांना सेवा देत आहेत. अशावेळी ही घटना घडणे निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया लातूर जिल्हा आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

हल्ल्याची घटना निषेधार्ह असून, आरोपीवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच अमित देशमुख यांनीही यामध्ये लक्ष घालावे, असे संघटनेने सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच अशा प्रवृत्ती रोखण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहितीही संघटनेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #लातूर #डॕक्टरावरचाकूहल्ला #निषेध #संताप #अल्फासुपरस्पेशलिटी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मंञिमंडळाच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत झाली चर्चा आणि काही निर्णय
Next Article अनलॉक तीनसाठी गृहमंञालयाकडून नियमावली जाहीर; तंदुरुस्त राहण्यासाठी जिम चालू होणार

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?