ठाणे : ठाणेच्या उल्हासनगरात एका इमारतीचा स्लॅब आज दुपारी अचानक कोसळला. यात ४ जण ठार झाले आहेत. तर एक व्यक्ती अजूनही बेपत्ता असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. मात्र आता एएनआयने पाच मृत झाल्याचे वृत्त दिले आहे.
https://twitter.com/ANI/status/1393611092668993537?s=19
उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक १ मधील मोहिनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून तो पहिल्या मजल्यावर आला. त्यामुळे येण्या जाण्याचा रस्ताच बंद झाला होता. परिणामी इमारतीमधील रहिवासी इमारतीतच अडकले होते.
उल्हासनगरमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. उल्हासनगरच्या कॅम्प परिसरातील मोहिनी पॅलेस इमारतीच्या चौथ्या माळ्याचा स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आला.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393562734508208135?s=19
कॅम्प नंबर एक मध्ये ही पाच मजली इमारत आहे. मोहिनी पॅलेस असे या इमारतीचे नाव आहे. आतापर्यंत ११ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. पाच जण अजूनही अडकले असून बचाव मोहिम सुरु आहे, असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दुपारी दीडच्या सुमारास या इमारतीचा स्लॅब कोसळला. चौथ्या मजल्याचा स्लॅब अन्य मजल्यावर कोसळून त्याखाली लोक अडकले, असे ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण १६ जण अडकले होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393567121423044620?s=19
* मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
ठाणेच्या उल्हासनगरात एका इमारतीचा स्लॅब आज दुपारी अचानक कोसळला. यात आतापर्यंत ४ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बचावकार्य सुरु असून इमारतीतील ११ जणांना अग्निशमन दलाने जखमी अवस्थेत बाहेर काढलं आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. तसेच, जखमींवर श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून उपचार केले जाणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1393586066024648709?s=19