नवी दिल्ली – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम अनलॉकमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 3 साठी नियमावली जारी केल्या आहेत.
1 ऑगस्टपासून रात्रभर असलेला कर्फ्यू बंद होणार आहे. तसंच 5 ऑगस्टपासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शाळा-कॉलेज 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहतील. मेट्रो, थिएटर, स्विमिंग पूल बाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. गर्दी करण्यास सक्त मनाई असेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास अनुमती
गृह विभागाकडून अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित इतर नियमांचं पालन करुन नागरिकांना स्वांतत्र्य दिवस साजरा करता येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना मास्कचा वापर करणं बंधनकारक असेल. याशिवाय सरकारच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करणं गरजेचं असेल, असा आदेश केंद्र सरकारकडून जारी करण्यात आला आहे.
* कंटेन्मेंट झोनमध्ये कडकडीत लॉकडाऊन
दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोन परिसरात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहतील. केंद्रीय गृह खात्याकडून याबाबत महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत.
* देशभरात काय सुरु काय बंद?
– कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन
– जीम उघडण्यासाठी परवानगी
– नाईट कर्फ्यू हटवला, राञी फिरण्यावरील निर्बंध हटवले
– 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंदच राहणार
– मेट्रो, लोकल ट्रेन बंदच राहणार
– शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार
– ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन शिक्षण सुरु राहणार
– सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंदच राहणार
– आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम असेल.
– सामाजिक/ राजकीय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवरही बंदी कायम असेल.