पुणे : काँग्रेस खासदार राजीव शंकरराव सातव (वय 47) यांचं कोरोनानं निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील 21 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते.
ठाकरे सरकारला सापडला म्युकरमायकोसिसवर जालीम उपाय https://t.co/EYIgPmG8Hb
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
सातव यांना चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत 1075 प्रश्न विचारत 205 वाद विवादांमध्ये सातव सहभागी झाले होते. राजीव सातव यांची 81 टक्के उपस्थितीही उल्लेखनीय होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) May 16, 2021
राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. सोमवारी सकाळी 10 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
I’m very sad at the loss of my friend Rajeev Satav. He was a leader with huge potential who embodied the ideals of the Congress.
It’s a big loss for us all. My condolences and love to his family. pic.twitter.com/mineA81UYJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2021
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करुन राजीव सातव यांना अभिवादन केले. प्रियंका गांधी यांनीही शोक व्यक्त केला आहे.
https://twitter.com/priyankagandhi/status/1393788260862730242?s=19
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी दु: ख व्यक्त केले.
निशब्द !
आज एक ऐसा साथी खो दिया जिसने सार्वजनिक जीवन का पहला कदम युवा कांग्रेस में मेरे साथ रखा और आज तक साथ चले पर आज…
राजीव सातव की सादगी, बेबाक़ मुस्कराहट, ज़मीनी जुड़ाव, नेत्रत्व और पार्टी से निष्ठा और दोस्ती सदा याद आयेंगी।
अलविदा मेरे दोस्त !
जहाँ रहो, चमकते रहो !!! pic.twitter.com/5N94NggcHu
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 16, 2021
खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्युमोनियाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे. खरंतर, कोरोनाची लागण झाल्यामुळे सातव यांना खूप त्रास झाला. यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम यांनी जहांगीर रुग्णालयाला भेट देत सातव यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली होती. त्यानंतर कदम यांनी प्रकृती स्थिर असून ते कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गावर नक्की मात करतील, अशा विश्वास व्यक्त केला होता.
भारतीय तटरक्षक दलात 75 पदांसाठी भरती, तयारीला लागा https://t.co/mgCkpYBRgH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून बरं वाटत नव्हतं. कोविडची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी करून घेतली. २२ एप्रिल रोजी या चाचणीचा अहवाल आला होता. त्यात सातव यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २३ एप्रिल रोजी ते जहांगीर रुग्णालयात दाखल झाले. उपचारांनंतर त्यांची प्रकृती उत्तम होती मात्र, २५ एप्रिलला त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे तातडीने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तिथे कोविडवरील उपचार ते घेत असले तरी कालपासून प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
Extremely saddened to know sudden demise of Shri Rajiv Satav ji due to Covid. Its a great loss for congress party and the nation.
My sincere condolences to the bereaved family.May his soul rest in peace. Om Shanti.🙏 pic.twitter.com/6DFYRYkmXl— Sunil Choudhary (@SunilChoudharyO) May 16, 2021
अखेर या जीवघेण्या संसर्गावर सातव यांनी यशस्वी मात केली पण त्यांना आता न्युमोनियाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे पक्षातही चिंतेचं वातावरण आहे.
* कोण होते राजीव सातव?
राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या. शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. फेब्रुवारी 2010 ते डिसेंबर 2014 या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं.
कांग्रेस की युवा राजनीति का ऊर्जावान चेहरा आदरणीय राजीव सातव जी नहीं रहे , ईश्वर उनकी पुण्य आत्मा को शांति प्रदान करें , व अपने श्री चरणों में स्थान दें।🙏 💐#Rajivsatav pic.twitter.com/uKoPel58Vi
— Dr. Abhishek Anand (@DrAbhishekINC) May 16, 2021