पणजी / मुंबई : मुंबई आणि गुजरातच्या दिशेने येणाऱ्या तौत्के चक्रीवादळाने अचानक दिशा बदलली आणि ते गोव्याच्या समुद्र किनाऱ्याला धडकले आहे. या वादळाचा तडाखा गोव्यात दिसून येत आहे. तर वादळामुळे मुंबईला असलेला धोका टळला आहे. तर वादळामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटकमध्ये ४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई आणि गुजरातच्या दिशेने येणाऱ्या तौत्क चक्रीवादळाने अचानक दिशा बदलली आणि ते गोव्याच्या समुद्र किनाऱ्याला धडकले आहे. या वादळाचा तडखा गोव्यात दिसून येत आहे. तर वादळामुळे मुंबईला असलेला धोका टकळा आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात वादळामुळे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. तर वादळामुळे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्नाटक ४ जणांचा मृत्यू झाला आहे.
चारवेळा संसदरत्न पुरस्कार सन्मानित खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह येऊनही मृत्यू, झुंज अपयशी https://t.co/dNFQpyf1GQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
चक्रीवादाळाचा फटका हवाई वाहतुकीला बसण्याची शक्यता आहे. यामुळे चेन्नई, तिरुअनंतपूरम, कोच्ची, बेंगळुरू, मुंबई, पुणे, गोवा आणि अहमदाबादमधील उड्डाणांवर १७ मेपर्यंत परिणाम होण्याची शक्यता आहे, असं विस्ताराकडून सांगण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. हे वादळ गोव्यापासून 350 किलोमीटर अंतरावर आहे. 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर ते किनारपट्टीपासून 350-400 किमी दूर असेल. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला जाणवेल. ताशी 60 ते 70 प्रति वेग असलेल्या वाऱ्यामुळे कोकण आणि गोव्यातील झाडे तसंच कच्च्या घरांची पडझड होईल. 16 तारखेला रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या ठिकाणी परिणाम जाणवतील. तोक्ते चक्रीवादळ 18 तारखेला विरावळ/पोरबंदर ते नलिया या गुजरातमधील किनारपट्ट्यांमध्ये धडकेल, अशी माहिती डॉ. भुते यांनी दिली.
Cyclone Tauktae hit coastal parts of Goa. Visuals from Panaji pic.twitter.com/qPGI0CnUjS
— ANI (@ANI) May 16, 2021
तौत्के चक्रीवादळाने दिशा बदलल्याने ते गोव्याच्या किनारपट्टीला धडकले आहे. यामुळे गोव्यात जोरदार वाऱ्यावसह दिवसभर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यात महाराष्ट्र, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीतील तयारीचा आढावा घेतला जात आहे.
Union Home Minister Amit Shah chairs a review meeting with the CMs of Gujarat, Maharashtra & Administrator of Daman & Diu and Dadra Nagar Haveli, to assess preparedness of States/ UT & Central Ministries/ Agencies concerned, to deal with situation arising out of Cyclone Tauktae pic.twitter.com/SKbji1QRkv
— ANI (@ANI) May 16, 2021
तौत्के चक्रीवादळाचा तडाखा कर्नाटकलाही बसत आहे. वादळामुळे कर्नाटात मुसळधार पाऊस पडतो आहे. गेल्या २४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे. खासकरून किनारपट्टी भागात पाऊस पडत आहे. पावसाने ७३ गावांना झोडपून काढलं आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
ठाकरे सरकारला सापडला म्युकरमायकोसिसवर जालीम उपाय https://t.co/EYIgPmG8Hb
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
दुसरीकडे वादळाच्या धोक्यामुळे गुजरातमध्येही तयारी करण्यात आली. एनडीआरएफच्या २४ टीम राज्यात तैनात करण्या आल्या आहेत. यापैकी १३ टीम बाहेरून बोलावण्यात आल्या आहेत, असं गांधीनगरमधील एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट रणविजय कुमार सिंह यांनी सांगितलं.