मुंबई : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो! ॐ शांती, असं ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यांच्यासह अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री राजीव सातव!
जनहिताच्या अनेक प्रश्नात आम्ही एकत्रित येऊन संघर्ष केला आहे. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी आहे… pic.twitter.com/QJ0J3mDJSv— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 16, 2021
राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार काँग्रेस नेते आणि खासदार राजीव सातव यांचे आज (रविवार) कोरोनाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी त्यांचे पार्थिव शरीर हिंगोलीत आणण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली. सोमवारी सकाळी 10 वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.
तरुण, आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
या कठीण प्रसंगी हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, ही प्रार्थना करतो!
ॐ शान्ति— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 16, 2021
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे.लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/4GiYGi3xSC
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2021
काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या या तरुण आणि उमद्या नेत्याच्या निधानाने काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच इतरही पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव यांनी गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे, असा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती, असेही पवार यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खासदार राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी असून, नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले आहे. pic.twitter.com/ykkwOCm28U
— Ashok Chavan (@AshokChavan1958) May 16, 2021
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. . भावपूर्ण श्रद्धांजली काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
निशब्द..
आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस.
माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही.
.
भावपूर्ण श्रद्धांजलीकाय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे.
अलविदा मेरे दोस्त ! pic.twitter.com/mYU8b0ASJn
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 16, 2021