सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे काल शनिवारी दुपारी निधन झाले. आज रविवारी म्हेत्रेंच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक जमले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन घोषित आहे. अशात गर्दी जमली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर कमेंट होत आहेत.
अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी
सोलापूर : कोरोनाचे नियम तोडून मोची समाजाचे नेते, काँग्रेस कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी #surajyadigital #गर्दी #अंत्ययात्रा #सुराज्यडिजिटल #solapur #सोलापूरhttps://t.co/T3LMEi4N7n— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
करण म्हेत्रे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हेत्रेंच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे कार्यकर्ते संबंधित हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी करण म्हेत्रे यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी – काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे आणि मुले असा परिवार आहे. समाजातील धडपडीचा युवा नेता कोरोनाचा बळी गेल्याने दुःख व्यक्त होत आहे.
चारवेळा संसदरत्न पुरस्कार सन्मानित खासदार राजीव सातव यांचे निधन, कोरोनाची चाचणी निगेटिव्ह येऊनही मृत्यू, झुंज अपयशी https://t.co/dNFQpyf1GQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापुरात आज म्हेत्रेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी, अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला.
पोलीस प्रशासनाने जन् माणसांच्या भावना ओळखून मोठ्या मनाने कुणाला ही अडवणूक केली नाही, आणि या अंतयात्रेला सहकार्य केले, जांबमुनी चौक, मौलाली चौक, लष्कर ,सात रस्ता या मार्गावरून ही अंत्ययात्रा मोदी स्मशानभूमीत आली या अंत्ययात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल जॉन फुलारे हनुमंत सायबोळू, अंबादास करगुळे, गणेश डोंगरे ,अब्राहम कुमार, यल्लाप्पा तूपदोळकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने विविध पक्षातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
'राजीव सातव यांच्या आश्वासक आणि अभ्यासू नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला' https://t.co/Mad0yTWUab
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
करण म्हेत्रे हे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सोलापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते. मोची समाजात त्यांचं वजन होतं. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत म्हेत्रेंचा पुढाकार होता.
चक्रीवादळ गोव्याला धडकले; कर्नाटकात ४ जणांचा मृत्यू,वादळामुळे हवाई वाहतुकीवर परिणामhttps://t.co/hqfZgNrenB
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण म्हेत्रे यांनी समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ताडीच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी स्वखर्चाने जिमही बांधल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले.