Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: घरात जागा नसल्याने ‘शिवा’ झाला झाडावर १८ दिवस ‘क्वारंटाईन’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

घरात जागा नसल्याने ‘शिवा’ झाला झाडावर १८ दिवस ‘क्वारंटाईन’

Surajya Digital
Last updated: 2021/05/17 at 4:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

हैदराबाद :  तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका तरुणालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच बसून १८ दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याची माहिती पुढे आली आहे. कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे.

तोक्ते चक्रीवादळ – वीज गेली, नो मोबाईल नेटवर्क, नो इंटरनेट; मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टी https://t.co/TQ4FdCFP3Y

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

संपूर्ण देशात कोरोना संसर्गाचे दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले. अनेक कुटुंब उध्वस्त झालेत. घरातील एखाद्याला करोनाचा संसर्ग झाला तर त्याला १४ दिवस क्वारंटाईन अर्थात विलीगीकरणात राहावं लागतं. मात्र अनेकांना जागेअभावी छोट्या घरांमध्ये क्वारंटाईन राहणं अवघड ठरतं. याच समस्येमुळे तेलंगाणा राज्यातील एका तरुणाने कोरोनाची लागण झाल्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी चक्क झाडावर पूर्ण केल्याचं समोर आलं आहे.

अंडी चोरणे पोलिस शिपाईला पडले महागात; झाली निलंबनाची कारवाई https://t.co/X93SqPBfRQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे. येथे एका तरुणाला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन राहणं गरजेच होतं. मात्र घरात क्वारंटाईन होण्याची सुविधा नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच ११ दिवस काढले. या तरुणाचं नाव शिवा असून तो १८ वर्षांचा आहे.

कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् रिक्षावाल्याचा सुटला रिक्षावरचा ताबा https://t.co/Pg3z3mzVGk

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

काही दिवसांपूर्वीच शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र घर लहान असल्यामुळे घरात क्वारंटाईन होणं शक्य नव्हतं. शिवाय घरातील सदस्यांना करोनाची बाधा होण्याचा धोका होता. यावर मार्ग काढत शिवाने घराशेजारी असलेल्या झाडावरच बांबूच्या सहाय्याने मचाण तयार केली. यावर त्याने ११ दिवस पूर्ण केले. शिवाला घराशेजारच्या झाडावरच क्वारंटाईन होण्याची शक्कल सुचली. बांबूच्या साहाय्याने शिवाने झाडावर एक लहानशी मचाण तयार केली आणि त्यावरच बसून १८ दिवस काढले.

राजीव सातव अनंतात विलीन, मुलीने दिला आईला धीर https://t.co/Ul6ZwqIbf4

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

आमच्या गावात विलगीकरण केंद्र नाही. माझ्या कुटुंबात चार जण राहतात. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. गावातील काही जणांना सरपंचांना याबाबत सांगितलं. मात्र ते मदतीसाठी पुढे आले नाहीत. गावातून अन्य कुणीही मदतीला आलं नाही. सर्वजण कोरोनाला घाबरून घराबाहेरच पडत नाहीत. एक बादली दोरीला बांधून त्यातून अन्नपदार्थ आणि अन्य गरजेच्या गोष्टी घेतल्या, असं शिवाने सांगितलं.

कोरोना ड्युडी : सोलापूर शहरात 32 शिक्षकांना बाधा; तीन मृत्यू, मदतीचा प्रस्ताव एकाचही नाही, कोरोनाचे काम नाकारणा-या शिक्षकांना पगार नाही https://t.co/uI9g5IP9T2

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #Due #lack #space #house #Shiva #quarantined #tree #18days., #घरात #जागा #नसल्याने #शिवा #झाडावर #१८दिवस #क्वारंटाईन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तोक्ते चक्रीवादळ – वीज गेली, नो मोबाईल नेटवर्क, नो इंटरनेट; मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टी
Next Article ‘तौत्के’: महाराष्ट्रात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, नऊजण जखमी, पुढचे काही तास धोक्याचे

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?