सोलापूर : जुळे सोलापूर परिसरातील रत्नमंजिरी नगरात चोरट्यांनी एका रात्रीत दोन बंद घरे फोडून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार आज,बुधवारी सकाळी उघडकीस आला.
याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिना महंमद शेख (वय 45, रा. रत्नमंजिरी नगर, जुळे सोलापूर ), शिवानंद विठोबा पुजारी (रा. रत्नमंजिरी नगर) यांचे घर चोरट्यांनी फोडले. शेख या 27 रोजी त्यांचे मूळ गाव औराद येथे गेल्या होत्या. चोरट्यांनी त्यांचे घर फोडत 30 हजारांचे सोने, रोख 20 हजार रूपये आणि साड्या असा मिळून 52 हजारांचा माल लंपास केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर पुजारी हे लॉकडाऊन असल्याने अक्कलकोट येथे रहावयास गेले होते. चोरट्याने त्यांचेही घर फोडत 69 हजारांच्या सोन्याच्या वस्तू आणि रोख 10 हजार असा मिळून 79 हजारांचा ऐवज लंपास केला. दोन्ही घरात मिळून चोरट्याने 1 लाख 31 हजारांचा ऐवज लुटून नेला. शेख यांच्या घराशेजारी राहणार्यांनी दोघांना चोरी झाल्याची माहिती कळवली. स.पो.नि. शेटे तपास करत आहेत.