मुंबई : राज्यातील अनेक भागात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394237315011158021?s=19
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढलाय. राज्यातील अनेक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394253026399903746?s=19
यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394294320493072385?s=19
शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिलीय. तर दोन दिवसांत 70 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
* औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर
औरंगाबादमध्ये सध्या कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस हा आजार थैमान घालताना दिसत आहे. म्युकरमायकोसिसमुळे औरंगाबादमध्ये गेल्या दीड महिन्यांत 16 जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 201 रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. आतापर्यंत 113 जणांचे डोळे काढण्यात आले आहेत. राज्यात म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण औरंगाबादेत आहेत. सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण सुद्धा औरंगाबादमध्येच आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणा प्रचंड धास्तावली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1394266049214775301?s=19