बार्शी : कोरोनाची कोणतीही चाचणी न करता फोनवर थेट अहवाल प्राप्त झाल्याच्या घटना आज बार्शीत आढळून आल्या आहेत. ज्यांच्या मोबाईलवर हे मेसेज आले आहेत ते अगदी अवाक झाले आहेत. नशीब हे सर्व अहवाल निगेटिव्ह होते. जर पॉझिटिव्ह असता तर भीतीने वेगळेच चित्र निर्माण झाले असते.
गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीवर कडाडले #महाविकासआघाडी #कडाडले #Gopichand #Padalkar #surajyadigital #मागासवर्गीय #सुराज्यडिजिटल #इशारा #आदेश https://t.co/X38VROq4vX
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
आलेल्या अहवालांपैकी सर्वच अहवाल हे निगेटीव्ह असल्याने फोन धारकाचा जीव भांड्यात पडला असला तरी सध्याच्या कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत असे प्रकार घडणे संशयास्पद आहे. आरोग्य विभागाने याचा छडा लावण्याची गरज आहे. विशेष म्हणजे हे सर्व चाचणी अहवाल शासकीय मेसेज सेंटरकडून आले आहेत.
मुंबई – 2 मोठी जहाजं भरकटली; 410 जण अडकले, गुजरातला बसणार फटका
https://t.co/HyoYoHxkda— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
कोरोनासंबंधित कोणत्याही प्रक्रियेसाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. अँटीजेन चाचणी असो वा आरटीपीसीआर ज्या नागरिकांची चाचणी करावयाची आहे. त्याचा मोबाईल क्रमांक आरोग्य यंत्रणेकडून घेतला जात आहे. लसीकरणासाठी हीच परिस्थिती आहे. पहिली लस घेताना जी नोंदणी करावी लागते, त्यात मोबाईल क्रमांक नोंदविला जात आहे. लस घेतल्यानंतर मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या क्रमांकाच्या आधारेच शासनाकडून विविध संदेश मोबाईलधारकास प्राप्त होत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे मोबाईल क्रमांक आरोग्य यंत्रणेकडे जमा झालेले आहेत. कोरोनाची चाचणी बाबतचे संदेश मोबाईल क्रमांकावर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडील मेसेज सेंटरकडून येत आहेत. हे मेसेज सेंटर शासकीय यंत्रणेकडूनच वापरले जात आहे. असे असताना कोरोनाची कोणतीही चाचणी न करता अहवाल कसे काय दिले जात आहेत? याबाबत संशय निर्माण होत आहे.
म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, 12 रुग्णांचा मृत्यू, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल, औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहरhttps://t.co/pirH4nMWoQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 17, 2021
चाचणी किटची विल्हेवाट लावण्यासाठी तर बोगस चाचण्या दाखवून अहवाल दिले जात नाहीत ना? का घाईगर्दीत मोबाईल क्रमांक चुकीचा नोंदविला जावून अहवाल दिले जात आहेत. याची यंत्रणेने चौकशी करणे गरजेची आहे.