सांगली : सांगली जिल्ह्यात मनपा कार्यक्षेत्रात 116 नवीन रुग्ण, शहरी भागात 22 नवीन रुग्ण, ग्रामीण भागात 29 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 167 रुग्णांची भर पडल्याने, एकूण रुग्ण संख्या 2065 वर पोहोचली आहे. त्यातच बुधवारी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडाही 70 वर पोहचला आहे.
जिल्ह्याचे रुग्णसंख्या 2065 वर पोहोचली असली तरी आजअखेर बरे झालेली रुग्णसंख्या 952 आहे. सध्या उपचारा खाली 1043 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 70 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 33 जणांची अवस्था चिंताजनक आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
आजअखेर मनपा क्षेत्रातील 1077, शहरी 156, ग्रामीण 832 पॉझिटिव्ह रुग्ण आले होते. मनपा क्षेत्राने ग्रामीण भागालाही आता मागे टाकले आहे. बुधवारचे नवीन पॉझिटिव्ह आटपाडी तालुका 6 जत तालुका 4,कवठेमहांकाळ 9, मिरज तालुका 12,पलूस तालुका 1,वाळवा तालुका 3,तासगाव तालुका 14, शिराळा तालुका 2,सांगली 91 मिरज 25 असे आहेत.
बुधवारच्या मृतांमध्ये खणभाग सांगली येथील 55 वर्षांचा पुरुष, कडेगाव येथील 50 वर्षांची महिला, खणभाग सांगली येथील 70 वर्षांची महिला, गावभाग सांगली येथील 55 वर्षांची महिला, मिरज येथील 62 वर्षांचा पुरुष, दुसरा मिरज येथील 52 वर्षांची महिला असा समावेश आहे.
* तालुका निहाय रुग्ण संख्या
आटपाडी 127,जत 126, कडेगाव 56, कवठेमहांकाळ 69, खानापूर 49, मिरज 131, पलूस 83, शिराळा 182, तासगाव 57, वाळवा 108, मनपा 1077 अशी संख्या आहे.