सोलापूर / मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुरुवार (ता. २० मे ) सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. यात महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
'प्रिसिजन'ने केले एका महिन्यात मोदी स्मशानभूमी विद्युतदाहिनीचे नूतनीकरण https://t.co/sSLHjtregv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर हे प्रमुख अधिकारी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटींगला उपस्थिती राहणार आहेत.
संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृत्युदरही वाढतोय. मात्र बरे होणाऱ्यांची संख्याचे प्रमाणही चांगले आहे, मागील काही दिवसात ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, बेडची कमतरता भासली.
कोरोनाबाधित रुग्णांवर विनापरवाना उपचार विनित हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा, आर्युवेद शिक्षण आणि बोर्डावर अॅलोपॅथीची डिग्री
https://t.co/EPiB6pUFdC— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनेक जिल्ह्यात लसीचा मोठा तुटवडा आहे. परंतु या मागील आठ दिवसात ऑक्सिजन बेड रेमडेसिविर इंजेक्शन ओरड कमी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे असे चित्र असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत आहे. यामध्ये विशेष करून ० ते १८ वयोगटातील बालके यांना संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्या; व्हॉट्सॲपला स्पष्ट सूचना https://t.co/h0XkvFjs8R
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे, लसीकरणाची माहिती घेतली जाईल , मृत्युदर कमी करण्याच्या सूचना होतील, या बैठकीला सोलापूर जिल्ह्यासह चंद्रपूर, अहमदनगर, नाशिक, सातारा, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, अमरावती, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, जालना, लातूर, नागपूर, परभणी व बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
* सोलापुरात म्युकर मायकोसिसचा शिरकाव
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता बुरशीजन्य म्युकर मायकोसिस हा डोळ्यांचा आजार होऊ लागला आहे, आता या बुरशीजन्य आजारासाठी औषधे इंजेक्शनची गरज भासत आहे, ती सुद्धा महागडी इंजेक्शन आहेत, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर व बार्शीमध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण आढल्याची माहिती समोर आली आहे. यात चारजणांचा मृत्यू झाल्याचेही नोंद आहे.
सोलापुरात म्युकरमायकोसिसचे 50 पेक्षा अधिक रुग्ण, चारजणांचा मृत्यू https://t.co/SaVABURcEL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021