नांदेड : कोरोना रुग्णावर मृत्यूनंतरही 3 दिवस उपचार सुरू ठेवल्याचं उघडकीस आलं आहे. नांदेड येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंकलेश पवार यांचा 21 एप्रिलला मृत्यू झाला होता. मात्र, केवळ पैसे उकळण्यासाठी त्यांचा मृत्यू 24 एप्रिलला झाल्याचे हॉस्पिटलकडून घोषित करण्यात आले. पत्नी शुभांगी पवार यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितली असता, जिल्हा न्यायालयाने गोदावरी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान, मोदींनी गुजरातला जाहीर केले एक हजार कोटीचं पॅकेज https://t.co/RWn7XID24C
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
कोरोना काळात खाजगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्याने मृत्यूनंतर ही एका कोरोना रुग्णावर तब्बल तीन दिवस उपचार करण्याचा प्रताप नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भांडाफोड केला असून न्यायालयाच्या आदेशाने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात 51 हजार 457 तर मुंबईत 4 हजार 565 जणांनी केली कोरोनावर मात #coronafree #कोरोना #surajyadigital #सुराज्यडिजिटल #mumbai #maharashtra #महाराष्ट्र #मुंबई pic.twitter.com/cpNJL6jr3j
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
मुजामपेठ येथील अंकलेश पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची पत्नी शुभांगी पवार यांनी त्यांना शहरातील गोदावरी हॉस्पिटलमध्ये 16 एप्रिल 2021 रोजी दाखल केले होते. या ठिकाणी दाखल करताना त्यांच्याकडून अनामत म्हणून 50 हजार रुपये भरून घेण्यात आले. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावत असल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यातच 20 एप्रिल रोजी त्यांना आयसीयूमध्ये हलविल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच दिवशी टॉमीझुलब नावाचे 35 हजार रुपयांचे इंजेक्शन द्यावे लागणार असून पैसे जमा करण्यास सांगितले होते. शुभांगी यांनी पैसे भरण्यासाठी मुदत मागितली होती, रुग्णालयाने त्यांना 24 एप्रिलपर्यंतची परवानगी दिली होती.
सोलापूरसह १७ जिल्ह्यांचा नरेंद्र मोदी घेणार उद्या कोरोना परिस्थितीचा आढावा
https://t.co/Bn4CIgfERO— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021
* आणखी 40 हजार रुपयांची मागणी
24 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शुभांगी यांनी रुग्णालयात 90 हजार रुपये जमा केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांना अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शुभांगी यांनी डेड बॉडी आणि उपचाराच्या कागदपत्रे मागितली परंतु रुग्णालयाने ती देण्यास नकार दिला. त्यानंतर 26 एप्रिल रोजी त्यांना उपचाराची कागदपत्रे देण्यात आली. त्यात अंकलेश पवार यांचा 21 एप्रिल रोजी 12 वाजता निधन झाल्याची नोंद असल्याचे धक्कादायक पुढे आले. विशेष म्हणजे 21 ते 24 या तिन्ही दिवसांची उपचाराची बिले लावण्यात आली होती. अशाप्रकारे जादा बिल आकारून ही प्रेताची विटंबना केल्याने शुभांगी यांना धक्का बसला. त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र मागितले असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणात शुभांगी यांनी ऍड शिवराज पाटील यांच्या मदतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोलापुरात म्युकरमायकोसिसचे 50 पेक्षा अधिक रुग्ण, चारजणांचा मृत्यू https://t.co/SaVABURcEL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 19, 2021