मुंबई / पुणे : आता घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. आयसीएमआरने यासाठी कोरोना रॅपीड अँटीजन टेस्टला परवानगी दिली आहे. यासाठी पुण्यातील Mylab Discovery Solutions ने CoviSelf ही कीट तयार केली आहे. हे टेस्ट किट एका आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल.
कमाईची सुवर्णसंधी; मोदी सरकार शेती सोलार पॅनलला देणार पैसे, नापीक जमीन शेतकर्यांच्या उत्पन्नाचे स्रोत होणार
https://t.co/4Wde5vG4sd— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
कोरोनाची लक्षणे आणि कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच नाकातून स्टॅबचा नमुना घेऊन टेस्ट करता येऊ शकते. लवकरच ही किट मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकते. टेस्ट कशी करायची, यासाठीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
Today, Mylab has taken an important and essential step to help India and the world fight the worst pandemic in the history of mankind. A step that will empower every Indian to fight this pandemic. We feel humbled to give India – its first Self-use Covid-19 test kit – CoviSelf. pic.twitter.com/5Y9VxEIEEV
— Mylab Discovery Solutions (@MylabSolutions) May 20, 2021
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग करण्यासाठी कोविसेल्फ किटला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता कोणालाही अवघ्या 250 रुपयात घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट (RAT) आणून कोव्हिड चाचणी करता येईल. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. ICMR ने मात्र विनाकारण चाचणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
सोलापूर मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांची तक्रार; पोलीसांकडून मारझोड, अपमान https://t.co/m3gwuXmFyH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे. RAT चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोरोनाबाधित म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षणं असूनही (सिम्पटमॅटिक) ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना कोरोना संशयित मानलं जाईल. ते स्वतःची आरटी-पीसीआर टेस्ट करु शकतात.
हॉट अभिनेत्री सनी लिओनीमुळे एका कर्जबाजारी शेतकऱ्याला झाला फायदा https://t.co/WsLvIn7sMP
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी 5 से 7 मिनिटांची वेळ लागेल, तर निगेटिव्ह येण्यासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटांचा वेळ लागेल. टेस्ट किटच्या पाऊचमध्ये आधीच भरलेली एक्स्ट्रॅक्शन ट्यूब, नेझल स्वॅब, एक टेस्ट कार्ड आणि सेफ्टी बॅग असेल. याशिवाय टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला आपल्या फोनमध्ये मायलॅब कोविसेल्फ अॅप डाऊनलोड करावे लागेल. कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व व्यक्तींना होम आयसोलेशन, ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं पालन करुन काळजी घ्यावी लागेल.
कोरोनापासून वाचवण्यासाठी कोरोना देवीची स्थापना https://t.co/GMfeJBQ29z
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021
* याचा कसा वापर करायचा, वाचा
मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीच्या युजर मॅन्युअलनुसार नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 से 4 सेमी आतपर्यंत टाकावे. त्यानंतर नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवावे. स्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाकावा आणि उरलेला स्वॅब तोडून टाकावा. ट्यूबचे झाकण बंद करावे. टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाकावेत. चाचणी अहवालासाठी 15 मिनिटं वाट पाहावी. 20 मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल. टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘C’वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘C’ आणि सेक्शन ‘T’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.
सोलापूर – ओडिसावरुन सोलापूरला अॉक्सिजन एक्सप्रेस दाखल, 93 मेट्रिक टन अॉक्सिजन दाखल, सोलापूरला 26 टन मिळणार, उर्वरित इतर जिल्ह्यांना..माहिती देतायत प्रांतअधिकारी हेमंत निकम #solapur #surajyadigital #oxygen #Express #सोलापूर #सुराज्यडिजिटलhttps://t.co/Wc8mkm9NlA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021