सोलापूर : सोलापूर शहरात आज गुरूवारी कोरोनाचे 106 रुग्ण आढळून आले आहेत. शहरवासियांच्या सुदैवाने आज कोरोनाचा एकही मृत्यू नाही. माञ आज नव्याने 106 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 929 वर पोहचला आहे.
गुरूवारी एक ही मृत्यू नाही, मात्र 803 अहवाल निगेटिव्ह तर 106 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 53 पुरुष तर 53 महिला रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 929 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 893 तर महिला 2 हजार 36 रुग्णांचा समावेश आहे. आज एक ही मृत्यू नसला तरी आतापर्यंत शहरांमध्ये 356 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 234 तर महिला 122 रुग्णांचा समावेश आहे. गुरूवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 909 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 803 अहवाल निगेटिव्ह तर 106 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आतापर्यंत 32 हजार 975 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 27 हजार 866 आहे. तर 4 हजार 929 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 574 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 हजार 999 आहे.