मुंबई : कोरोना काळात डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना पालघरच्या विरार पूर्वमध्ये घडली आहे. विरार पूर्वेला बालाजी हॉस्पिटल आहे. एक महिला रुग्ण आपली कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी तेथे गेली होती. टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरला शिवीगाळ व मारहाण केली. शिवाय याचा व्हिडिओही बनवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांचं २६ तारखेला देशव्यापी आंदोलन, दिल्लीतील शेतकरी आंदोलन सुरुच, १२ पक्षांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करीत दिला पाठिंबा https://t.co/lpxxV4QNaR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटल्स बेड, ऑक्सिजन सिलिंडर कमी पडत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.
https://twitter.com/DrNutshell/status/1396482335059501057?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अशात डॉक्टरांवर हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच एक प्रकार विरार पूर्वमध्ये समोर आला आहे. आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.
stick broke in nose during RT-PCR test. Doctor abused and beaten up @ balaji hospital virar pic.twitter.com/z2ItGBEy1I
— Suhas Birhade ↗️ (@Suhas_News) May 23, 2021
टेस्ट करत असताना महिलेच्या नाकात आरटीपीसीआरसाठी वापरली जाणारी स्टिक तुटली. यावेळी डॉक्टर पळून जात असल्याचा समज करत नातेवाईकांनी मारहाण सुरु केली. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या प्रकरणात नातेवाईकांच्या विरोधात विरार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरार पोलिसांनी डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही. संबंधित व्हिडिओ नातेवाईकांकडूनच शूट करण्यात आल्याची माहिती आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महामुद पटेल यांचे निधन,आठवड्यापूर्वीच झाले होते पत्नीचे निधन https://t.co/OH2H25Bu9L
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021