जळगाव : राष्ट्रवादीतील महत्त्वाचा मुस्लिम चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांचं काल निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी रात्री त्याचं निधन झालं. त्यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 2014 मध्ये त्यांना यावल रावेर विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता.
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करत गफ्फार मलिक यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.
Former*
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) May 24, 2021
त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी पक्षाचा एक महत्त्वाचा मुस्लिम नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. सोमवारी रात्री त्याचं निधन झालं. त्यांना अलीकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्याठिकाणी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. यानंतर सोमवारी त्यांचा हृदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवाजीचे राज्य अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिकजी यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख वाटलं, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे. माझ्या संवेदना त्यांचे कुटुबीय आणि मित्रपरिवारासोबत आहे, असंही ते म्हणाले.
Extremely saddened to hear about the demise of @NCPspeaks former State Minority President Abdul Gaffar Malik Ji. It’s an unbearable loss for the family. May his soul rest in peace. My deepest condolences to his family. pic.twitter.com/LZV3v0rUSe
— SONALI DESHMUKH (@sonalidspeaks) May 25, 2021
गप्फारभाईंनी 2009 ते 2014 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही समर्थपणे भूषविले होते. या कालावधीत जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे पाळमुळे मजबूत झाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हाजी गफ्फार मलिक हे करीम सालार यांचे जवळचे मित्र व सहकारी होते. तालिम-ए-अंजुमन मुसलमीन या शैक्षणिक संस्थेचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषविणार्या गफ्फार मलिक यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान होते. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सचिवपदही त्यांनी समर्थपणे भूषविले होते. या शिक्षण संस्थेचा आता वटवृक्ष झाला असून याच्या वाटचालीत त्यांनी घेतलेले अविश्रांत परिश्रम कारणीभूत होते.
https://twitter.com/ShoaibAlShaikh2/status/1397024244844822530?s=19
मुस्लीम समाजाचे राज्य पातळीवरील नेते म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य महत्वाच्या नेत्यांशी त्यांचे आत्मीयतेचे संबंध होते. मध्यंतरी विधानपरिषदेसाठी देखील त्यांचे नाव चर्चेत होते. यातच आज त्यांचे अकस्मात निधन झाले.
राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असल्यास लगेच राजीनामा, राज्यभर दौरा, …यामुळे भाजपाच्या सुभाष देशमुखांकडे दाखवले बोट https://t.co/bbii2UtIhW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचे विश्वासू सहकारी अशी गफ्फार मलिक यांची ओळख होती. परंतू सुरेश जैन यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतरही मलिक राष्ट्रवादीतच होते. पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्यापूर्वी ते जळगाव नगरपालिका आणि नंतर जळगाव महापालिकेत नगरसेवक आणि इतर समितीच्या अध्यक्षस्थानी होते.
भोला 'पडोसन'!, सुनिल दत्त यांचा स्मृतीदिन (ब्लॉग)https://t.co/U7OfTD8G7u
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021