Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाखांचे आश्वासन असे पूर्ण केले; काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींचे अभिनंदन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ लाखांचे आश्वासन असे पूर्ण केले; काँग्रेसच्या नेत्याकडून मोदींचे अभिनंदन

Surajya Digital
Last updated: 2020/07/30 at 7:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातून काळा पैसा परत आणून १५ लाख देऊ हे आश्वासन मात्र आता वेगळ्याच पद्धतीने पूर्ण केले आहे. केवळ काळ्या पैशांऐवजी परदेशातून कोरोना आणून देशाला १५ लाख कोरोनाचे रुग्ण दिले व भारताला जगाच्या नकाशावर मानाचे स्थान दिले, त्याबद्दल प्रदेश काँग्रेसतर्फे आम्ही मोदी यांचे हार्दिक अभिनंदन करतो, अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सहा वर्षांपूर्वी सत्तेवर येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जनतेला भरमसाठ आश्वासने दिली होती. त्यातील एकही आश्वासन त्यांनी अद्याप पूर्ण केले नाही. परंतु, त्यांनी हे आश्वासन कोरोनाची संख्या १५ लाख पूर्ण करुन केल्याची टीका केली. भाजपचे महाराष्ट्रातील नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला कोरोनाच्या संदर्भात तुम्ही काय केले? हा प्रश्न विचारत आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांप्रमाणे आमची बौद्धीक क्षमता नसल्याने आम्ही आमच्या अल्पबुद्धीने वैज्ञानिक दृष्टीकोनातून योग्य वैद्यकीय उपचार, नविन रुग्णालयांची उभारणी, चाचण्यांची संख्या वाढवून चेस द वायरस सारखी प्रभावी कार्यपद्धती अंमलात आणली. ज्याची प्रशंसा आयसीएमआरने केली असून देशात हेच मॉडेल राबवले पाहिजे, असे म्हटले आहे.

धारावीमध्ये करोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांची जगभरातून वाहवा केली गेली आहे. परंतु भाजप नेत्यांच्या ते पचनी पडले नाही. त्यांच्या दृष्टीकोनातून आम्ही मोदी यांच्या अभिनव व अनोख्या उपचारपद्धती प्रमाणे थाळ्या वाजवायला हव्या होत्या, दिवे लावले पाहिजे होते म्हणजे कोरोना नेस्तनाबूत झाला असता, अशी टोलेबाजी सचिन सावंत यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या अनोख्या योजनांमुळे आणि कर्तबगारीमुळे कोरोना परदेशातून भारतात आलाच नाही तर आज कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकाकडे वेगाने वाटचाल करत आहे. यातून भारताची कीर्ती पूर्ण विश्वात पसरली आहे. हे केवळ मोदींनी योग्य निर्णय योग्य वेळेला घेतले यामुळेच शक्य झाले आहे. यामागे निश्चितच मोदींच्या दूरदृष्टीचा आणि अभिनव कार्यपद्धतीचा हात आहे, असा टोला लगावत मोदी करोना विरोधातले युद्ध २१ दिवसांत जिंकणार होते परंतु प्रत्यक्षात करोनाच्या साथीने भारतीयांविरोधात युद्ध पुकारले आहे, अशी चिंता सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #पंतप्रधान #१५लाख #अभिनंदन #काँग्रेस #कोरोना #काळापैसा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आता ईडीनेही घातले लक्ष; मुंबई पोलिसांकडून रियाला मदत ?
Next Article अश्‍लिल मेसेज पाठवून विवाहितेचा विनयभंग; आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?