सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11 मधील शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे पद उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. मगर यांना तीन अपत्ये असून तिसरे अपत्य 12 सप्टेंबर 2011 नंतर झाल्याचे कारण देत हा निकाल दिल्याचे ऍड. अमित आळंगे यांनी सांगितले. भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी त्यासंदर्भात याचिका दाखल केली होती.
'यास चक्रीवादळ' घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार https://t.co/OVmX2g6GpV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपकडून पराभूत झालेल्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी मगर यांना तीन अपत्ये असून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. निवडणुकीसाठी मगर यांनी तिसरे अपत्य त्यांचे नसून सुनीता व दत्तात्रेय मगर यांचे असल्याचे भासवून जन्म दाखल्यावर 2011 रोजी दुरूस्त करून आई- वडिलांचे नाव बदलल्याचेही त्यांचे म्हणणे होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशात म्युकरमायकोसिसचे 5, 424 रुग्ण, महाराष्ट्रात 130 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार https://t.co/X1MNzvzBpe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
मात्र, मूळ दाखल्यावर अनिता मगर याच त्याच्या आई असल्याची नोंद आहे. मगर यांनी तिसरे अपत्य त्यांचे नसल्याबाबत सबळ पुरावा न्यायालयात सादर केला नाही. अन्य मुद्यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने मगर यांची याचिका फेटाळून लावली. तर त्यांचे पद रद्द करण्याचा आदेश कायम ठेवला.
राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असल्यास लगेच राजीनामा, राज्यभर दौरा, …यामुळे भाजपाच्या सुभाष देशमुखांकडे दाखवले बोट https://t.co/bbii2UtIhW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
मगर यांच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. म्हंता यांच्यातर्फे ऍड. आळंगे यांनी, तर अनिता मगर यांच्या वतीने ऍड. विश्वासराव देवकर व महापालिकेतर्फे ऍड. विश्वनाथ पाटील आणि सोलापूर न्यायालयातर्फे म्हंता यांच्याकडून ऍड. निलेश ठोकडे यांनी काम पाहिल्याचेही मूळ याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे सांगितले.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला (संतोष वाघमारे -टेंभुर्णी )#surajyadigital #ujjain #सुराज्यडिजिटल #जयंतपाटील #jayantpatil #पुतळा #status https://t.co/TA5BOjq4HY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021