रायपूर : छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारकडून कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरचा पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा फोटो हटवण्यात येत आहे. त्या जागी आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून टीका होत आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीचे पैसे आमचे राज्य सरकार देत आहोत मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो का लावू नये, असे स्पष्टीकरण छत्तीसगड काँग्रेसने दिले आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका अनिता मगर यांचे सदस्य पद रद्द https://t.co/bSd6Ek6NwI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
कोरोना काळात या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या संकटाच्या काळातही नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवलेलं नाही. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का? असा प्रश्न अनेकदा अनेकांचा उपस्थित केला आहे. मात्र छत्तीसगड सरकारकडून कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरचा पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा फोटो हटवण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींच्या जागी आता छत्तीसगड सरकारने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्यावरुन छत्तीसगडमध्ये वादंग उठलं आहे.
'यास चक्रीवादळ' घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार https://t.co/OVmX2g6GpV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
छत्तीसगडमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो लावण्यास सुरुवात केली आहे. यावरुन विरोधीपक्ष भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सत्ताधारी काँग्रेस कोरोना लसीकरणाऐवजी फोटो प्रचारावर जास्त लक्ष देत असल्याची टीका भाजपने केली. भाजपच्या टीकेनंतर छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी भूपेश बघेल यांचा फोटो लावण्यामागचं कारणही सांगितलं आहे.
देशात म्युकरमायकोसिसचे 5, 424 रुग्ण, महाराष्ट्रात 130 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार https://t.co/X1MNzvzBpe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी म्हटलं की, राज्य सरकार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च करत आहे. त्यामुळे लसीकरणानंतर नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो असलेलं प्रमाणपत्र दिलं जात आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण राज्य सरकार करत आहे मग लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो का लावू नये? असा सवालही आरोग्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
1800 च्या हिशेबाच्या गोंधळानंतर 10+10=40 च्या हिशेबाचा गोंधळ व्हायरल, बघा तुम्हाला सुटता का हा हिशेब #surajyadigital #सुराज्यडिजिटल #हिशेब #हिशोब #चाळीस #गोंधळ #व्हायरलhttps://t.co/g3CRfk7hkV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021