मुंबई : पत्रकार गिरीश कुबेर यांनी ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ नावाचं पुस्तक लिहिलंय. यात छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचा आरोप भाजप नंतर आता काँग्रेसनंही केलाय. त्यामुळं या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय. महापुरुषांचा अपमान खपवून घेतला जाणार नसल्याचंही पटोले म्हणाले.
'फ्लाईंग सिख' मिल्का सिंग यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल https://t.co/5KMxYvNnvO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू झाला आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा आक्रमक सवाल राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि संभाजी बिग्रेडने केला आहे. तसेच या संघटानांनी कुबेर यांच्या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
"जे स्वतःला वाचवू शकले नाही ते कसले डॉक्टर", रामदेवबाबांचा आणखीन एक व्हिडीओ आला समोरhttps://t.co/6VxSlwMmEo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप या संघटनांनी केली आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. काही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने याप्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी कुबेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'लसीचे पैसे आमचे सरकार देत आहेत मग आम्ही फोटो का लावू नये' https://t.co/IcECAs4I8t
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
कुबेर यांच्या पुस्तकावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्यांसोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा मिळतो. लेखकांचा हाच उद्देश असेल तर हे गंभीर आहे. या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
'यास चक्रीवादळ' घोंघावू लागलं, उद्या सकाळी किनारपट्टीवर धडकणार https://t.co/OVmX2g6GpV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 25, 2021
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी पुस्तकावर आक्षेप घेतला असला तरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंटरेस्टिंग पुस्तक वाचत असल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी तसं ट्विटच केलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरून राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह असल्याचं बोललं जात आहे.
त्यांचे वय, अनुभव व व्यासंगाचा मान ठेवून नम्रपणे स्वानुभवातून हे नक्कीच सांगू शकतो, की चुकीच्या संदर्भाने लिहिली गेलेली एखादी गोष्ट पुसून काढण्यासाठी कित्येक वर्षे जातात.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 24, 2021
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून आणि कुबेर यांना पत्रं लिहून पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्या सोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा हाच उद्देश लेखकांचा असेल तर हे गंभीर आहे.या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी@CMOMaharashtra@Dwalsepatil pic.twitter.com/Cuvxj2IQsm
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 23, 2021
कुबेर यांच्या पुस्तकावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्यांसोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा मिळतो. लेखकांचा हाच उद्देश असेल तर हे गंभीर आहे. या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.