Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेनेच्या आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, संजय गायकवाडांचे हल्लेखोरांना आव्हान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, संजय गायकवाडांचे हल्लेखोरांना आव्हान

Surajya Digital
Last updated: 2021/05/26 at 4:43 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बुलढाणा : विविध वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. गायकवाड यांची इनोव्हा कार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे.

या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही गांभीर्याने घेतली आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397461062228660225?s=20

संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली गाडी जाळण्याचा आणि घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री दीड वाजता ते घरी परत आले. त्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन वाहनाच्या इंधन टाकीवर पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

इनोव्हाच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडी पेटली असती, तर ती सर्व वाहने पेटली जातील आणि घरही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून गायकवाड परिवाराला इजा पोहोचेल, या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हा हल्ला करताना परिसरातील विद्युत पुरवठाही हल्लेखोरांनी तोडला होता, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397454799268827136?s=20

नागरिकांनी रोग प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. मात्र या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची दिलगिरीही गायकवाडांनी व्यक्त केली. ज्यांची मनं दुखावली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केलं, त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले होते.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397446629888651265?s=20

* संजय गायकवाड यांचे हल्लेखोरांना आव्हान

‘रोखठोक काम करण्याचा, खरं बोलण्याचा माझा जो स्वभाव आहे, तो एखाद्याला पटला नसेल किंवा आज माझ्या मतदारसंघात जी धडाक्यानं कामं सुरू आहेत, ती गेल्या ५० वर्षांत झाली नाहीत, ती एखाद्याला पाहवली नसतील म्हणून हा प्रकार केला गेला असावा. मात्र, हल्लेखोरांनी माझ्याशी सामना करावा. खुलेआम कुठेही बोलवावे. कुटुंबाशी खेळू नये. कुटुंबावर भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न करू नये,’ असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे. तसेच पोलीस आपले काम करत असून लवकरच ते हल्लेखोरांना पकडतील,’ असा विश्वासदेखील संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1397435894907375618?s=20

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

TAGGED: #Attempt #fire #ShivSena #MLA's #car #SanjayGaikwad #challenge, #शिवसेना #आमदार #गाडीपेटवण्याचा #प्रयत्न #संजयगायकवाड #हल्लेखोरांना #आव्हान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केले होमहवन
Next Article कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिम्मत नाही – बाबारामदेव

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?