सोलापूर : कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या खून प्रकरणात अटकेत असलेले एमआयएम पक्षाचे नगरसेवक तौफीक शेख यांना बंगळुरू हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांचे बंधू आरिफ शेख यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
17 मे 2019 रोजी विजयपूरजवळील कोलार भागात रेश्मा यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणात नगरसेवक तौफीक शेखवर गुन्हा दाखल झाला होता. पैशाच्या वादातून हा प्रकार झाला होता. याप्रकरणात कर्नाटक पोलिसांनी अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान, शुक्रवारी त्यांना बंगळुरू हाय कोर्टाने जामिन मंजूर केल्याची माहिती त्यांचे बंधू आरिफ शेख यांनी दिली.