नवी दिल्ली : कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिम्मत नाही असे विधान योग गुरू बाबा रामदेव यांनी केले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावा व्हायरल होत आहे.
ऍलोपॅथी हे मुर्ख विज्ञान आहे असे वादग्रस्त विधान बाबा रामदेव यांनी केले होते. त्यावर देशातल्या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर बाबा रामदेव यांनी खेद व्यक्त करत आपले वक्तव्य मागे घेतले होते. आता इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना एक हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस पाठवून त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपा नेत्याने केले होमहवन https://t.co/Rig8kIJ2GO
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
असे असताना बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही असे बाबा रामदेव या व्हिडीओ मध्ये म्हणत आहेत. ट्विटवर काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांना अटक करा अशा आशयाचे ट्रेंड सुरू होते, त्यावर बाबा रामदेव म्हणत आहेत की, कुणाच्या बापामध्ये हिंम्मत नाही मला अट करण्याची. अनेक लोकांनी quit ramadev, thug ramdev असे ट्रेंड चालवले, या ट्रेंडमध्ये पण आपण टॉपवर होतो असे म्हणत बाबा रामदेव यांनी टाळ्या वाजवल्या. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवसेनेच्या आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, संजय गायकवाडांचे हल्लेखोरांना आव्हान https://t.co/yNbleLTKY4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
* एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीची दावा
ॲलोपॅथी उपचार पद्धती व डॉक्टरांवर टीका करणे योगगुरु रामदेवबाबा यांना महागात पडले आहे. रामदेवबाबा यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत १५ दिवसांमध्ये लेखी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीची दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) उत्तराखंड शाखेने पाठवली आहे.
योगगुरु रामदेवबाबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूला ॲलोपॅथी उपचार पद्धती व डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याविरोधात ॲलोपॅथी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.
फेसबूक, ट्विटर, इन्टाग्रामवरून का सुरु आहे वाद? केंद्र सरकारच्या कारवाईकडे लक्ष https://t.co/eAMvCbhoSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021