Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करा

Surajya Digital
Last updated: 2021/05/26 at 8:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

टेंभुर्णी : उजनीचे पाणी इंदापूरला वळवण्याचा आदेश रद्द केल्याचे तोंडी सांगितले. पण आठवडा होऊनही लेखी आदेश काढला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणा-या जलसंपदामंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेने केली आहे.

विलासराव देशमुखांच्या जयंतीदिनी अभिनेता मुलगा आणि अभिनेत्री सुनेची भावनिक पोस्ट https://t.co/DXo4aknFJr

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

भीमानगर येथील उजनी धरणाच्या मेन गेटवर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदेशीररित्या पळविले आहे ते त्वरित रद्द करावे या मागणीसाठी चालू असलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मिडियासमोर पाणी पळवण्याचा आदेश रद्द केला, असे सांगितले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोणतेही लेखी पत्र न देता तोंडी सांगून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व आंदोलनकर्त्यांची स्पष्ट फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.आंदोलनस्थळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरीक्षक अमित शितोळे यांच्याकडे निवेदन देऊन केली.

तरूण सरपंचानं करून दाखवलं; सोलापुरातलं 'गाव' कोरोनामुक्त केलं https://t.co/ZaOdIkY2JA

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021

बेंबळे जि.प.सदस्य बंडूनाना ढवळे यांनी जि.प.गटातील १५ ग्रामपंचायतीचे ठराव सरपंचासह उजनी धरणावरील चालू असलेल्या आंदोलनास प्रत्यक्ष जाऊन पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांकडून त्यांचे आदर्श जि.प.सदस्य म्हणून कौतुक झाले.

उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला https://t.co/sBigiW6Nqx

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख,प्रहार औद्योगिक संघटनेचे अमोल जगदाळे,जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील, विठ्ठल मस्के,सचिन पराडे पाटील, रामदास खराडे,मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक,नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड,सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक, सौरभ आरकिले, अमोल पाटील, अकोले बुद्रुकचे सरपंच सतीश सुर्वे, उपसरपंच बशीर मुलाणी, ग्रां.प.सदस्य कल्याण नवले,रमेश पवार,तुषार पाटील, सुजीत दरगुडे उपस्थित होते.

उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला (संतोष वाघमारे -टेंभुर्णी )#surajyadigital #ujjain #सुराज्यडिजिटल #जयंतपाटील #jayantpatil #पुतळा #status https://t.co/TA5BOjq4HY

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021

* अन्यथा १ जूनला हलगीनाद आंदोलन

प्रभाकर देशमुख म्हणाले, राज्याचे जबाबदार जलसंपदामंत्र्यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसमोर मिडीयावर धांदात खोटे बोलून आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र न देणं कितपत योग्य आहे. हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच ठरवावे, या शेतकऱ्यांच्या गंभीर विषयात लक्ष घालावे, अन्यथा टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर १ जून रोजी हलगीनाद आंदोलन करण्यात येईल, असे सांगीतले.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

TAGGED: #Filecase #against #WaterResources #Minister #cheating #farmers, #शेतकऱ्यांची #फसवणूक #करणा-या #जलसंपदामंत्र्यांवर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विलासराव देशमुखांच्या जयंतीदिनी मुलगा आणि सुनेची भावनिक पोस्ट
Next Article पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचे थैमान, 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?