कोलकाता : यास चक्रीवादळाच्या लँडफॉलला सुरुवात झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली.
#WATCH | Jharkhand: Ranchi experiences a change in weather in wake of #CycloneYaas.
As per IMD, the state will receive heavy to very heavy rainfall today & tomorrow with extremely heavy rainfall in isolated places. pic.twitter.com/Cm9g4v4wdg
— ANI (@ANI) May 26, 2021
यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागनं वर्तवला आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली.
Boats and shops damaged after landfall of #CycloneYaas in Odisha. Check posts barricades blown away with the wind at Udaipur near the West Bengal-Odisha border. pic.twitter.com/lRQqHOMqSY
— ANI (@ANI) May 26, 2021
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मंत्रालयात ठाण मांडून बसल्या आहेत. या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या किनारपट्टी भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. तत्पूर्वी मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यांमुळे उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील नैहाती आणि हलिहारमध्ये अनेक घरांचे नुकसान झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसासह आणि वादळी वारे वाहत आहेत. या पमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या चक्रीवादळामुळे जवळपास एक कोटी लोकं प्रभावित झाले असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. तसंच 15 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
West Bengal Chief Minister Mamata Banerjee holds review meeting with District Magistrates, Disaster Management Committee, and other officials in view of #CycloneYaas, in Nabanna pic.twitter.com/BqM3DzWVg7
— ANI (@ANI) May 26, 2021
* ठळक घडामोडी
– ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते भूवनेश्वर, कोलकाताची विमान वाहतूक पुढील 6 तासांसाठी बंद
– तौक्ते चक्रीवादळासाठी 250 कोटींची नुकसान भरपाई, राज्य सरकारने तयार केला प्रस्ताव
– यास चक्रीवादळामुळे झारखंडमध्ये आज आणि उद्या
– मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज
– मुंबईहून कोलकाताला जाणारी विमानं रद्द, सहा उड्डाणं रद्द.