भोपाळ : काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेनं अश्लील व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल केले आहे. यानंतर आमदारानं पोलिसांत धाव घेतलीय. नीरज दीक्षित असं आमदारांच नाव असून ते मध्य प्रदेशच्या महाराजपूरचे आमदार आहेत. एका अनोळखी नंबरवरुन आलेल्या मॅसेजला त्यांनी गरजू व्यक्तीचा मॅसेज समजून रिप्लाय केला. मात्र, एक दिवस महिलेनं व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य केले व त्यानंतर ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. असं तक्रारीत म्हटलंय.
एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले https://t.co/hnN4SOkLEC
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
अज्ञात महिलेच्या ब्लकमेलिंगनंतर संबंधित आमदारानं पोलिसाकडे मदतीसाठी पोलिसांत धाव घेतली आहे. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. संबंधित अज्ञात आरोपी महिला मागील काही दिवसांपासून पीडित आमदाराला अश्लील व्हिडीओ कॉल करून त्रास देत होती. या प्रकरणी गढीमलहरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पश्चिम बंगालमध्ये 'यास' चक्रीवादळाचे थैमान, 15 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले https://t.co/C5e8ZHQYzN
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
संबंधित काँग्रेस आमदाराचं नाव नीरज दिक्षित असून ते मध्य प्रदेशातील महाराजपूर मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, मागील काही दिवसांपासून त्याच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज येते होते. मतदार संघातील एखाद्या गरजू व्यक्तीचा मेसेज असल्याचं समजून त्यांनी याला रिप्लाय दिला. पण यानंतर संबंधित मोबाइल नंबरवरून व्हिडीओ कॉल येणं सुरू झालं. एकेदिवशी संबंधित महिलेनं व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. त्यानंतर संबंधित अज्ञात महिलेनं ब्लॅकमेल करायलाही सुरुवात केली, असं आमदार दिक्षित यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
कुणाच्या बापामध्ये मला अटक करण्याची हिम्मत नाही, एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीची दावा https://t.co/RPzCHLbNvJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021
विद्यमान आमदार नीरज दिक्षित यांनी गढीमलहरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून महिलेचा शोध घेतला जात आहे. संबंधित महिला नेमकी कोण आहे? आणि ती आमदाराला का त्रास देत आहे? या बाबी पोलीस तपासानंतरच स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवसेनेच्या आमदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, संजय गायकवाडांचे हल्लेखोरांना आव्हान https://t.co/yNbleLTKY4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 26, 2021