कोल्हापूर : पंतप्रधान मोदी यांनी खासदार संभाजीराजे यांना भेट नाकारल्याच्या मुद्द्यावरून होणाऱ्या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे.
खासदार संभाजीराजेंना सर्वाधिक सन्मान भाजपनेच दिला आहे, त्यांना चारवेळा पंतप्रधानांनी भेट नाकारली असली तरी त्यापूर्वी चाळीस वेळा भेट दिली आहे, याबद्दल ते का सांगत नाहीत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणि करोनाची स्थिती गंभीर असल्यानेच पंतप्रधानांनी भेट नाकारल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना : यंदातरी आषाढी पायीवारी होणार का? उद्या महत्त्वाची बैठक https://t.co/HakYc4P6xJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
मराठा आरक्षणप्रश्नी चारवेळा पत्र लिहूनही संभाजीराजेंना पंतप्रधानांनी वेळ दिली नाही, यामुळे संभाजीराजे नाराज आहेत. याबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘छत्रपती घराण्याविषयी भाजपला प्रचंड आदर आहे. पक्षाने खासदार संभाजीराजे यांचा मोठा सन्मान केला आहे. खासदार होण्यासाठी त्यांना भाजपच्या कार्यालयात यावे लागू नये म्हणून मोदींनी त्यांना थेट राष्ट्रपती नियुक्त खासदार केले. अहमदाबाद येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सगळ्यांनी उभे राहून खासदार संभाजीराजे यांना सन्मान दिला होता.
मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्यावर भाजपाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा पक्षातर्फे आंदोलन करणार नाही, मात्र आंदोलनाला पाठिंबा देण्यावर भाजपा ठाम असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र – या 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईत पावसाची हजेरी, तीन दिवस पावसाची शक्यता
https://t.co/9HQctMmQZp— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना, प्राधिकरणाचे अध्यक्ष, गडकिल्ले संवर्धनासाठी निधी अशा विविध माध्यमातून संभाजीराजेंच्या कामाचा नेहमीच मान, सन्मान ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या सन्मानात पक्ष कुठेही कमी पडला नाही. चार वेळा भेट मागूनही पंतप्रधानांनी वेळ दिली नाही हे खरे असले तरी त्याला काही कारणे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट मागितली होती. पण हा मुद्दा सध्या राज्य सरकारच्या अखत्यारीतच आहे. मग भेटून करणार काय? चार वेळा भेट झाली नसली तरी पूर्वी ४० वेळा भेट झाली आहे हे ते का सांगत नाहीत, असा सवाल त्यांनी केला.
"मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा" https://t.co/QevQLlYFpx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
अहमदाबादमध्ये खा. संभाजीराजेच्या सन्मानार्थ मोदींसह सर्वजण उभे राहीले होते. एवढच नाही तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका असंही मोदी म्हणाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सध्या संभाजीराजे हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी भेट घेत आहेत. त्यात एक वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी खासदारकीही सोडायला तयार असल्याचं संभाजीराजे म्हणाले होते. तेव्हापासूनच भाजप आणि संभाजीराजे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. यावर संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही एवढच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजूला ठेऊन आम्ही सहभागी होणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
वादग्रस्त पुस्तकावरून लेखक, पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल https://t.co/TdgtZ553bR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
‘मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी जो संघर्ष होईल, त्यामध्ये पक्षाचा सहभाग असेल. संभाजीराजेच काय, कुणीही याचे नेतृत्व केले तरी भाजप त्यांच्यासोबत असेल. आरक्षण मिळण्यासाठी ज्यांना जे वाटेल ते करावे. भाजप त्यामध्ये सहभागी होईल. भले मग त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे. आरक्षणप्रश्नी मराठा समाज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असं पाटील म्हणाले. ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने तत्काळ मागास आयोगाची स्थापना करावी. करोनाचे संकट आहे म्हणून राज्य सरकारला कोणतीही जबाबदारी ढकलता येणार नाही,’ असंही त्यांनी सांगितलं. यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.