नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात. दक्षिण दिल्लीतील युट्यूबर गौरव गुप्ता याने व्हिडिओ कंटेंटसाठी चक्क एका श्वानाला फुगे बांधून उडवले आहे. हे श्वान त्याचे पाळीव असून डॉलर असं त्याचे नाव आहे. पीपल्स फॉर ॲनिमल्स सोसायटी या संस्थेने संबंधित तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
उजनीतून पाणी पळवण्याचा आदेश रद्द, निघाला लेखी आदेश, सोलापूरच्या एकजुटीला यश https://t.co/NIAMeyFzr9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
सोशल मीडियाचा फायदा घेतात. अनेकजण सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करतात तर काहीजण याचा उपयोग चुकीच्या कामासाठी करतात. अशा प्रकारे आपण झटपट प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात काहीतरी गुन्हा करून बसतो हे अनेकांच्या लक्षात देखील येत नाही. दक्षिण दिल्लीमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. यामध्ये एका युट्यूबरने युट्यूबला व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका श्वानाला त्रास दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याने कुत्र्याला त्रास दिल्याची तक्रार मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
कोरोना : यंदातरी आषाढी पायीवारी होणार का? उद्या महत्त्वाची बैठक https://t.co/HakYc4P6xJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वादग्रस्त पुस्तकावरून लेखक, पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल https://t.co/TdgtZ553bR
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
गौरव शर्मा या 32 वर्षीय तरुणाने एक व्हिडीओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने हेलियमच्या फुग्यांना एका पाळीव कुत्र्याला बांधले होते. फुगे हवेत सोडल्यानंतर कुत्रा देखील हवेत उडू लागला होता आणि त्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता अशी तक्रार पीपल्स फॉर अॅनिमल्स सोसायटी या संस्थेच्या गौरव गुप्ता यांनी मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ 21 मे रोजी शूट करण्यात आला होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर गौरव गुप्ता यांनी हि तक्रार नोंदवली आहे. युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी एका तरुणाने कुत्र्याला त्रास दिल्याचा आरोप केला जात आहे.
"मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा" https://t.co/QevQLlYFpx
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
हा व्हिडीओ २१ मे रोजी शूट करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौरव गुप्ता यांनी पुढाकार घेत तक्रार नोंदवली होती. पी.एस. मालवीय नगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी गौरव शर्मा मालवीय नगरमधीलच पंचशील विहार याठिकाणचा रहिवासी आहे. तो एक युट्यूबर असल्याने त्याने हा व्हिडिओ बनवला होता असे त्याने आपल्या जबाबात म्हंटले आहे.
रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी, विनम्र अभिवादन #पुण्यतिथी #रमाबाईआंबेडकर #अभिवादन #surajyadigital #विनम्र #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/Ex3LYfVDg9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021