जळगाव : राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत जळगावात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने दोन दिवसांनी त्यांच्या तीन मुलांवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती.
'मिशन इम्पॉसिबल 7' मध्ये दिसणार टॉम क्रूजसोबत प्रभास ? https://t.co/lF5GiugyPD
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
हाजी गफ्फार मलिक यांचे 24 मे रोजी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर 25 मे रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. त्यात गफ्फार मलिक यांचे पुत्र एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, फैजल अब्दुल गफ्फार मलिक यांचा समावेश आहे. यांच्यासह अन्य ५० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गिरीश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला.
सोलापुरात पर्यावरण दिनापासून 'माझे रोप, माझी जबाबदारी' अभियान, 16 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट https://t.co/HnTlKnlxOW
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ते राज्याच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हाजी गफ्फार मलिक यांचा राष्ट्रवादीतील प्रवास आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरुन रावेर विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र अवघ्या काही मतांच्या फरकामुळे त्यांचा पराभव झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अग्रेसर राहण्यासाठी त्यांचे मोठे योगदान असून पक्षवाढी करीता त्यांनी परिश्रम घेतले होते. राष्ट्रवादीचे
सर्वेसर्वा शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षात ख्याती होती. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात मलिक यांना अनेक पक्षातून बोलावणं आलं होतं. मात्र त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीसोबत निष्ठा राखली.
जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, प्रशासन अधिकारी, कुटुंबासाठी सोयhttps://t.co/tS1AmBz7YV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 27, 2021