नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 23 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने 23 जून हा अतिरिक्त दिवस राखून ठेवला आहे. या सामन्याच्या निकालासाठी सहावा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच जर या सामन्याचा निकाल अनिर्णित किंवा बरोबरीचा लागला तर दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद देण्यात येईल, असे आयसीसीनं सांगितलं.
समाधानी नसाल, तर बोर्डाच्या दोन परीक्षांच्या संधी; लगेच बारावीची परीक्षा, शक्य नाही https://t.co/yK335IXVNe
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
जागतिक कसोटी विजेतेपदाच्या अंतिम सामन्यासाठी आयसीसीने प्लेईंग कंडिशन्सची घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा ‘टाय’ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.
उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून सात ठार, गेल्याच आठवड्यातील दुर्घटनेत पाच मृत्यू https://t.co/laJhgxQVf7
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
भारत आणि न्यूझीलंड संघांत पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने या सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन्सची आज घोषणा केली आहे. त्यानुसार ही कसोटी अनिर्णीत राहिली किंवा ‘टाय’ झाली तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही कसोटी 18 ते 22 जून या कालावधीत इंग्लंडमधल्या साऊदम्प्टन खेळवण्यात येणार आहे.
आयसीसीने या कसोटीसाठी राखीव दिवसाचाही घोषणा केली आहे. या सामन्यासाठी 23 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांत कोणत्याही कारणांनी खेळ वाया गेल्यास तो राखीव दिवशी खेळवण्यात येईल. त्याबाबतचा निर्णय सामनाधिकारी आणि पंच मिळून 22 जूनला अखेरच्या तासात घेतील.
दारु अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, वेळापुरातील पारधी वस्तीतील घटना
https://t.co/5MCyT44Uow— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021
न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यासाठी आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. परंतु भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे संघातील सर्व खेळाडूंना इंग्लंडमध्ये दहा दिवस क्वॉरन्टीन व्हावं लागेल. मात्र क्वॉरन्टीन काळात खेळाडूंना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
13 कोटी खर्चून बांधलेला पूल पहिल्याच पावसात मोडून पडला, पुलाचा पाया कमजोर, 'यास' वादळाचा सामना करण्यात अपयशीhttps://t.co/qPFK2GedQm
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 28, 2021