Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले 
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले 

Surajya Digital
Last updated: 2021/05/29 at 9:58 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात अंघोळीस गेलेले चार मुले,  वाहून गेल्याची घटना आज शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुणे शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द, पुणेकरांमध्ये पोलिसांची धास्ती https://t.co/fkAAUvYzOv

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

समीक्षा शिवाजी तानवडे (वय १३) ,अर्पिता  शिवाजी तानवडे (वय ९) ,आरती शिवानंद पारशेट्टी (वय १३), विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय ११) असे बेपत्ता झालेल्या मुलां-मुलींची नांवे आहेत. समीक्षा तानवडे  इयत्ता आठवीत अर्पिता तानवडे व आरती पारशेट्टी दोघीजण सातवीत  आणि विठ्ठल पारशेट्टी  पाचवीत शिकत होता. या घटनेमुळे लवंगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

डब्ल्यूटीसी फायनल- आयसीसीची मोठी घोषणा, 18 ते 23 जून या कालावधीत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामनाhttps://t.co/OwIfEwzu3D

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

याबाबत अधिक माहिती अशी की,शिवाजी रामलिंग तानवडे (वय ४० रा.वाघोली हल्ली राहणार लवंगी ता.द. सोलापूर) हे भीमा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता थोड्या वेळाने त्यांच्या पाठीमागे तिच्या दोन मुली समीक्षा व अर्पिता व त्यांच्या  सोबत मेव्हण्याचे मुलगा विठ्ठल व मुलगी आरती असे चौघे नदीकडे आले. यावेळी त्यांना शिवाजी तानवडे यांनी घराकडे जाण्यास सांगितले.   त्यानंतर शिवाजी तानवडे हे पोहत नदीमध्ये आत गेले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

थोड्या वेळाने  चौघे मुले-मुली परत नदीकडे आले. यातील मुलगी समीक्षा हिला  पोहता येत होते परंतु अर्पिताला थोडे- थोडे पोहोता येत होते. त्यावेळी ते चौघे नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले, समीक्षा हिस पाण्यात पोहत असताना ती बुडू लागली तिला आरतीने पकडले व अर्पिता हिला विठ्ठल याने पकडल्याने ते चौघेजण बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकून शिवाजी लगेच त्यांच्याजवळ पोहत आला. त्यांने समीक्षा व आरती यांना थोडेसे बाजूला किनाऱ्याजवळ सोडून त्यांना कडेला जाण्यास सांगितले.

'पतंजली' बाटलीबंद तेल पुरवणारा कारखाना सील, भेसळ केल्याचा संशय https://t.co/OWUtQtGaq9

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

अर्पिता व विठ्ठल यांना नदीतून बाहेर काढण्यास ते परत नदीत आत गेले.यावेळी त्यांना कडेला आणत असताना इकडे काठावरील समीक्षा व आरती या पाण्याच्या प्रवाहामुळे बुडू लागल्या, इतक्यात शिवाजीच्या ताब्यातील विठ्ठल व अर्पिताही निसटले व तेही पाण्यात बुडू लागले.एकदम चारही जण बुडू लागल्याचे पाहून शिवाजीचा धीर सुटला. तो पण पाण्यात बुडू लागला. हे  पाहून त्याचे नातेवाईक राचाप्पा उर्फ अप्पू संगप्पा पारशेट्टी याने शिवाजीला बाहेर काढले. पण चारही बालके पाण्यात वाहून गेली.

१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार https://t.co/oIjtMxKZ5i

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

घटनेची माहिती मिळताच मंद्रूपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे,उपनिरीक्षक  गणेश पिंगुवले,पोलीस हवालदार साहेबराव गुंडाळे,बी.टी.राठोड, पोलीस अंमलदार शंकर पाटील,गावचे सरपंच संगमेश बगले-पाटील व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक मच्छिमारांच्या सहाय्यांने रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरू होते. पण चारही बालके पाण्यात वाहून गेले.

सोलापूर : उद्धव ठाकरे, काँग्रेसमुळे महाराष्ट्रात कोविड हत्याकांड, भाजप कोविडचे स्पेशल अॉडिट करणार- किरीट सोमय्या #kovid19 #भाजपा #solapur #political #अॉडिट #किरीटसोमय्या #solapur #सोलापूरhttps://t.co/BTqwPPW0sh

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Four #sparks #Swept #riverBhima #father #rescued, #भीमानदीत #चारचिमुकले #वाहूनगेले #वडील #बचावले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पतंजली’ बाटलीबंद तेल पुरवणारा कारखाना सील, भेसळ केल्याचा संशय
Next Article मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग – प्रकाश आंबेडकर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?