पुणे : खासदार संभाजीराजे भोसलेंनी आज वंबआचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. यानंतर आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं, दुसरं ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, राजकारणात ताजेपणाची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर ताजेपणा येईल,’ असं ते म्हणाले.
पुणे शहरातील विकेंड लॉकडाऊन रद्द, पुणेकरांमध्ये पोलिसांची धास्ती https://t.co/fkAAUvYzOv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल, असं आंबेडकर म्हणाले.
१०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार, ना भिजणार https://t.co/oIjtMxKZ5i
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. आता राजकारणात शिळेपणा आला आहे. त्यांनी भूमिका घेतली तर ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
'पतंजली' बाटलीबंद तेल पुरवणारा कारखाना सील, भेसळ केल्याचा संशय https://t.co/OWUtQtGaq9
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
संभाजी महाराजांनी घेतलेल्या विषयात राजकीय पक्षांना कधीच रस नव्हता. आरक्षणाच्या मुद्द्यावरच डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. नंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने आरक्षण मान्य केलं आणि बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता. आरक्षण हा व्यवस्थेशी जोडण्याचा भाग आहे. संभाजीराजेंशी चर्चा करत असताना आरक्षणावर चर्चा झाली. पण हा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर राजसत्तेची गरज आहे, हा विचार पुढे आला. या चर्चेचा हा मुख्य गाभा आहे, असं ते म्हणाले.
भीमा नदीत चार चिमुकले गेले वाहून; वडील बचावले, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील घटनाhttps://t.co/IlNZLqezvp
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचं पुनरावलोकन पुनर्विचार याचिकेद्वारे नाही तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत होणं महत्त्वाचं आहे. राजसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून यासंबंधी रिव्ह्यू मागवता येईल. त्यातून हे प्रकरण लार्जर बँकेकडे जाऊन त्यावर मार्ग निघू शकतो, असं आंबेडकरांनी सांगितलं.
भेट घेण्यामागे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील, हे कारण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
फक्त एक कॉल करा अन् कोरोना लस बुक करा https://t.co/K5qV7nQwyq
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 29, 2021
बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असं संभाजीराजे यांनी म्हटलं.