पुणे : क्षुल्लक कारणावरुन तरुणाने आपल्या पत्नीची हत्या केली. पुण्याच्या देहू येथे ही घटना घडली. पती वैभव व पत्नी पूजाचं गुरुवारी जोरदार भांडण झालं. यादरम्यान पूजाने वैभवला आईवरुन शिवी दिली. या रागातून वैभवने तिचा गळा दाबून खून केला. पुजाच्या घरच्यांना हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, शंका आल्याने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी चौकशी केली असता वैभवने गुन्हा कबूल केला.
विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला, ७-८ वर्षांच्या मुलाला मागे ठेवून पत्नीचे निधनhttps://t.co/p8JMd0CyfE
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
गुरूवारी (ता. २७ मे) सायंकाळच्या सुमारास पती वैभव तसेच पत्नी पूजा यांच्यात जोरदार भांडण झालं. मध्यरात्री पूजा झोपेत असताना भांडणाचा बदला घेण्यासाठी वैभवने झोपेत असतानाच पूजाचा गळा आवळला. आपला जीव वाचवण्यासाठी तसेच वैभवच्या हातातील गळा सुटावा यासाठी पूजाने अनेक वेळा प्रयत्न केले पंरतू तिचा मृत्यू होईपर्यंत वैभवने तिचा गळा सोडला नाही आणि अखेर पूजाचा मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रात्रभर पूजाच्या मृतदेहा शेजारीच वैभव बसून राहीला. त्यानंतर सकाळ होताच मयत पूजाच्या नातेवाईकांना त्याने सांगितले की, पूजाच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. यानंतर नातेवाईकांन तात्काळ पूजाच्या घरी दाखल झाले असता बिछाण्यातच तिचा मृतदेह त्यांना आढळून आला.
शाळेच्या परिसरात मिळाले २१५ विद्यार्थ्यांचे मृतदेह, देश हळहळला, आणखी काही मृतदेह सापडण्याची शक्यताhttps://t.co/MANfgGdob1
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
संबंधित घटनेबाबत पूजाच्या नातेवाईकांनी देहूरोड पोलिसांना खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत शहानिशा केली असता त्यांना संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटला. मग पोलिसांनी वैभवला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवताच कौटुंबिक कलहातून वाद झाल्याने पूजाचा गळा आवळून मारल्याची कबुली त्याने दिली.