मुंबई : राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. मात्र, अद्यापही दररोज नवे करोनाबाधित आढळून येत आहेत. मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. तसेच, राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या संपणार आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन वाढवण्यासंबधीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आज घेतला आहे.
'त्या' चारही चिमुकल्यांचे मृतदेह सापडले, वीस तासानंतर यश https://t.co/IfH5PdjbCV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव कोरोनामुक्त झालं आहे. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त केलं. याच्यासह कोमल करपे आणि पोपटराव पवार यांचाही उल्लेख मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. त्यांची भेट घेऊन माहिती घेणार असल्याचे सांगितले.
सगळ्या घरांनी ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होऊ शकतं. झालंही आहे. पोपटराव पवार यांनी गाव कोरोनामुक्त केलंय. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांनी गाव कोरोनामुक्त केलं. हे दोन तरुण गाव कोरोनामुक्त करू शकतात, तर आपण का नाही करू शकत?”
ते पुढे म्हणाले, “मी या तिघांशीही बोलणार आहे. शक्य झालंय तर तुमच्याशीही संवाद घ़डवून आणेल. राज्यातल्या इतर सरपंचांनीही या सरपंचांनी गाव कसं कोरोनामुक्त केलं ते पाहायला पाहिजे.”
देशमुख यांनी ग्रामस्थांना एकत्र करत गावात ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवली. परिणामी गावात कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली. सध्या गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
18 ते 44 वयोगटातील लोकसंख्येसाठी लागणाऱ्या दोन्ही डोस मिळून 12 कोटी लशींचे डोस एक रकमी घेण्याची आपली तयारी आहे. यासाठी आपण 24 तास लसीकरण करु शकतो. पण याला मर्यादा आहे, त्यात लसींचं उत्पादनं महत्वाचं आहे. जसा लसींचा पुरवठा वाढेल तसा आपण लशीकरणाचा वेगही वाढवणार आहोत. ४५ वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्रानं घेतलीय. तर १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यांची असल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तिसरी लाट आली तर आपण बेड वाढवू पण ऑक्सिजनची कमतरता भासली तर आपल्याला कठीण जाऊ शकतं. त्यातचं आता म्युकरमायकोसिसचा आजारही आला आहे. राज्यात याचे तीन हजार रुग्ण असल्याचे सांगितले.
* सोलापुरातील तरुण सरपंचाचे मुख्यमंत्र्यांकडून केले कौतुक – तिसरी लाट थोपवण्यासाठीचे नियोजन आणि लॉकडाऊनविषयी जनतेशी संबोधित करताना मुख्यमंत्री #surajyadigital #CM #CMOMaharashtra #सुराज्यडिजिल #lockdown #कोरोना #मुख्यमंत्री #ठाकरे #planninghttps://t.co/wj1PGCOHih
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
* बारावीची परीक्षा रद्द होणार का ? उद्धव ठाकरे म्हणाले…
बारावीची परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. ‘दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र बारावीच्या परीक्षेसंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, पण बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्राने एक धोरण ठरवायला पाहिजे, यासाठी आपण पंतप्रधानांना पत्र लिहणार’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
* तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून
मुख्यमंत्री कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातले. आता तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. “आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतोय. रुग्णाला बरं व्हायला उशिर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढलीय. त्यामुळे राज्यातील जनतेने खबरदारी घेणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच, जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादणे हे कटू काम आहे”, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
विनोदी अभिनेता भूषण कडूवर दुःखाचा डोंगर कोसळला, ७-८ वर्षांच्या मुलाला मागे ठेवून पत्नीचे निधनhttps://t.co/p8JMd0CyfE
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…
– तौक्ते चक्रीवादळ आपल्याला स्पर्शुन गेले, प्रशासनाने चांगल काम केले. धावता दौरा करुन आलो. .
– येत्या काळात लसीकरणाचा वेग वाढवणार
– 12 कोटी डोस घेण्याची राज्याची तयारी
– पावसाळ्यात साथीच्या रोगांचा धोका, सर्वांनी स्वास्थ्य जपायला हवे, साथीचे रोग रोखण्याची गरज
– रुग्णांच्या उपचारांसाठी उद्योगांचा ऑक्सिजन बंद करावा लागला, तो ही कमी पडला.