Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारत सरकारने आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल अशक्य; परवानगीसाठी करावे लागणार प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
खेळ

भारत सरकारने आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल अशक्य; परवानगीसाठी करावे लागणार प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2020/07/31 at 2:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : बीसीसीआयसाठी आयपीएलचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही आयपीएलच्या आयोजनात एक महत्वाची अडचण आहे. ही अडचण म्हणजे जोपर्यंत बीसीसीआयला भारत सरकारची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत आयपीएल खेळवण्यात येऊ शकत नाही. कारण भारत सरकारने जर आयपीएलला परवानगी दिली नाही तर आयपीएल होऊ शकत नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

काही कारणास्तव आयपीएलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या वर्षीचे आयपीएल हे १९ सप्टेंबरलाच सुरु होणार आहे. पण आयपीएलचा अंतिम सामना पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. आता आयपीएलचा अंतिम सामना ८ ऐवजी १० नोव्हेंबरला होणार असल्याचे समजते आहे. पण आयपीएलच्या मार्गातील एक समस्या म्हणजे भारत सरकारजी परवानगी, जी आणखी मिळालेली नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आयसीसीने विश्वचषक आणि बीसीसीआयने आयपीएलसाठी आशिया चषक रद्द केला. त्यानंतर आयपीएल ही १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे ठरवले गेले. युएईमध्ये आबुधाबी, दुबई आणि शारजा येथे आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. युएईच्या क्रिकेट मंडळानेही आज आपल्याला बीसीसीआयचे पत्र आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता आयपीएल युएईमध्येच खेळवले जाणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

* बीसीसीआयला लवकर घ्यावी लागणार परवानगी

भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयचे कामकाज कोण पाहणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलसाठी भारत सरकारची परवानगी कशी मिळवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भारत सरकारची परवानगी घेण्याची प्रक्रीया बीसीसीआयला लवकरच सुरु करावी लागणार आहे. कारण ही परवानगी मिळाल्याशिवाय त्यांना युएईमध्ये जाऊन आयपीएलचे आयोजन करता येऊ शकत नाही. त्यामुळेच भारत सरकारची परवानगी महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी आमदाराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इतर चारजणांवर गुन्हा, पक्षाने केले बडतर्फ
Next Article कांद्याला सर्वाधिक एक हजाराचा दर; जिल्ह्याच्या तुलनेत बाहेरुनच कांद्याची आवक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?