मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. फडणवीस यांनी शरद पवारांची मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपण शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती ट्विट करून दिली.
आला हो आला! स्कायमेट म्हणतं मान्सून आला ! , स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यामध्ये चांगलीच जुंपली https://t.co/2ReWsz0tnh
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
महाविकास आघाडी सरकारवर एकदा ही टीकेची संधी न सोडणार भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
* पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस घेतली भेट
स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी जोरदार टीका केली. पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस थेट शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते, असं सांगण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Met Former Union Minister & Senior leader Shri Sharad Pawar ji at his residence in Mumbai this morning. This was courtesy meeting.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/eqjabCHMh7— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 31, 2021
शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप समोर येऊ शकला नाही.
रामदेवबाबा विरोधात उद्या डॉक्टर्स पाळणार 'काळा दिवस', एफआयआर दाखल, व्हॉट्सअॅपवरील डीपीही ब्लॅक ठेवणार
https://t.co/onebOQqZHD— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
* भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष चिघळला
मधल्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि मनसुख हिरेन प्रकरणावर राष्ट्रवादीवर अनेक आरोप केले होते. त्यातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही 100 कोटी वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर केला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष चिघळला आहे.
संवाद धनगर बांधवांशी…जागर धनगर आरक्षणाचा #Holkar #अहिल्यादेवी #surajyadigital #जयंती #सुराज्यडिजिटल #चौंडी #पुण्यश्लोक #होळकर #अभिवादन #Rajmata #गोपीचंदपडळकरhttps://t.co/EiIjqxKd1A
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021