अक्कलकोट : करजगी- कलहिप्परगा शेतशिवारात आज सोमवारी सकाळी रानगवा प्राणी आढळला. याबाबत ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला कळविले असता वनविभाग त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. रानगव्याच्या शोधासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे. १८३५ साली अक्कलकोट तालुक्यात हा गवाप्राणी आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितले.
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #surajyadigital #अभिवादन #अहिल्यादेवी #पुण्यश्लोक #होळकर #जयंती #सुराज्यडिजिटल #Rajmata pic.twitter.com/lMNeGY7WUC
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
कल्लहिप्परगे येथील दहा ते बारा एकर उसात रानगवा घुसला आहे. त्याला शोधण्यासाठी पथक लावले असून परिसरातील जेऊर, शिरवळ व हंद्राळ आदी भागातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले. वनविभाग व पोलिस परिसरातील गावांना संदेश देत रानगव्यापासून धोका होऊ नये यासाठी प्रयत्न करताना दिसून येत होते आणि यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. यामुळे गोंधळ वाढला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
15 जूनपर्यंत लॉकडाऊन, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, सोलापुरातील तरुण सरपंचाचे केले कौतुक, बारावीची परीक्षा रद्द होणार का ? तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून https://t.co/gJndwUn2MA
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 30, 2021
रानगवा हंद्राळच्या दिशेने गेल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र सोमवारी दुपारपर्यंत रानगवा दिसून आला नाही. रानगवा सहसा माणसांवर हल्ला करत नाही, मात्र त्याला डिवचल्यास तो अंगावर येऊ शकतो.
वनविभागाच्या टीममध्ये धैर्यशील पाटील व जयश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शंकर कुताटे, गंगाधर विभूते, टी. एम. बादने, मुन्ना निरवणे आदींसह सहकारी रानगव्याच्या शोधात आहेत.
फडणवीस शरद पवारांना अचानक घरी जावून भेटले, चर्चांना उधाण, पत्रकार परिषद आटोपल्यानंतर फडणवीस घेतली भेट
https://t.co/gpgdrzq9Vd— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
काल रविवारी दुपारी एक वाजता अचानक रानगवा दिसल्याने परिसरात गोंधळ उडाला. शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे व मुनाफ चिरके आदींनी संबंधित वनविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. तेव्हा त्वरित वनविभाग व पोलिस प्रशासनाने याची दखल घेऊन संपूर्ण परिसर पिंजून काढला. संबंधित यंत्रणा कल्लहिप्परगे गावात पोचताच रानगव्याचा पुन्हा धुमाकूळ सुरू झाला. कल्लहिप्परगे परिसरातील उसाच्या फडात घुसलेला रानगवा आज सोमवारी दिवसभर वनविभाग व पोलिसांना शोधूनही सापडला नाही.