कोल्हापूर : मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्ये मतभेद समोर आले आहेत. तूर्तास संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता सरकारवर गंभीर आरोप केला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला. या ट्वीटमध्ये संभाजीराजे यांनी केंद्र की राज्य सरकार असा उल्लेख केलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या इंटेलिजन्स विभागाकडून पाळत ठेवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 31, 2021
मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणता मार्ग हाताळायचा, यावरून भाजपचे खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपमध्येच मतभेद असल्याचे समोर आले आहे. संघर्ष न करता सरकारला सहकार्य करण्याची खा. संभाजीराजे यांची भूमिका आम्हाला अमान्य आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पाटील यांच्या या भूमिकेमुळे एकीकडे तर्कवितर्क लढवले जात असताना दुसरीकडे या मुद्द्यावरून भाजपमध्ये खा. संभाजीराजे एकाकी पडल्याचे चित्र आहे.
मराठा समाजाकरिता मोठी बातमी, मिळणार दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ https://t.co/rH7wobvcLV
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
पाटील यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबतची भाजपची भूमिका नेमक्या शब्दात स्पष्ट केली. ‘मराठा आरक्षण लगेच मिळावे, समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जो जो व्यक्ती संघर्ष करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत. हे आम्ही दहावेळा सांगितले आहे. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजेंनी आरक्षण मिळाले पाहिजे, पण संघर्ष न करता मिळाले पाहिजे, असे स्पष्ट केले आहे. आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही, हे कोविड संपल्यावर बघू असेही त्यांनी सांगितले आहे. हे आम्हाला मान्य नाही’, असे ते म्हणाले. संभाजीराजेंच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम थांबवण्यास कोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांवर ठोठावला 1 लाखांचा दंडhttps://t.co/rG7163tvFt
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021
कोविडमुळे शांत बसण्याची त्यांची भूमिका असेल तर आम्हाला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची असेल तर आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोविडचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. जनजीवन व्यवस्थित सुरू आहे. भ्रष्टाचार सुरू आहे. तरीही मराठा समाजाने रुग्णसंख्या शून्यावर येईपर्यंत थांबायचे का? असा सवाल पाटील यांनी केला. 4 जून रोजी मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर कोर्टाकडे तारीख मागावी लागेल. पुनर्विचार याचिका उशिरा दाखल केल्याबद्दल न्यायालय सरकारला जाबही विचारेल. त्यामुळे याचिका दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली.
विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा टीझर रिलीज, पहा टीझर https://t.co/khfmh5tbOf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021