मुंबई : मुंबईत एका कार्यक्रमात सीएम उद्धव ठाकरे, रामदास आठवले, अजित पवार उपस्थित होते. यावेळी आठवलेंनी भाषणात ‘राज्याची कोणती कामे असतील तर सांगा मी ती केंद्रापर्यंत पोहोचवून मदत मिळवून देतो,’ असं म्हणाले. त्यानंतर हा धागा पकडत अजित पवारांनी ‘तौक्तेनंतर पंतप्रधानांनी लगेच गुजरातचा दौरा केला व 1 हजार कोटी दिले. महाराष्ट्राला निदान तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या,’ असा टोला पंतप्रधानांना लगावला.
5G विरोधात जुही चावला कोर्टात, दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं https://t.co/KxZEfDJtdp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. त्यात रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात राज्याची कोणती कामं असतील काही मागण्या असतील तर सांगा मी त्या केंद्रापर्यंत पोहोचवून कशी मदत करता येईल यासाठी प्रयत्न करतो, असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्याकडे दोन महत्वाच्या मागण्या करत मोदी सरकारवर निशाणा साधला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोठा निर्णय; 6 कोटी लोकांना दुसऱ्यांदा काढता येणार रक्कम https://t.co/MHlCTqIDOq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
“रामदास आठवले मला आणि मुख्यमंत्र्यांना म्हणाले की केंद्राकडून काही मदत हवी असल्यास कळवा. माझा रामदास आठवलेंना एवढीच विनंती आहे की तुम्ही केंद्रात आहात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवण करुन द्या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला तेव्हा मोदींनी केवळ गुजरातचा दौरा केला आणि तातडीनं १ हजार कोटींची मदत जाहीर केली. पण महाराष्ट्रात ते का आले नाहीत? हे अद्याप काही कळालेलं नाही. गुजरातला १ हजार कोटी दिलेत. महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा”, असं अजित पवार त्यांच्या भाषणात म्हणाले.
टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू https://t.co/N50WGZ9c9i
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
* रामदास आठवलेंना पवारांचा आणखी एक सल्ला
मुंबईतील विविध रस्त्यांची कामं आणि भविष्यात आवश्यक गोष्टींची माहिती करुन देताना अजित पवार यांनी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीवरही भाष्य केलं आणि रामदास आठवलेंकडे आणखी एक विनंती केली.
“मुंबईत विविध पायाभूत सुविधा उभ्या राहत आहेत आणि आगामी काळात आणखी कामं होतीलही. पण पेट्रोलच्या दरानं आता काही शहरात शंभरी गाठली आहे. त्यामुळे आठवले साहेब केंद्राला पेट्रोलच्या किंमतीतही लक्ष घालायला सांगा”, असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला.
24 तासांत 40 किमी रस्त्याचं काम पूर्ण ! लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद https://t.co/G9JMpoDhFI
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 31, 2021