लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे प्रताप चंद्र या व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. सीरमने तयार केलेली कोरोनावरील कोव्हिशिल्ड ही लस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार झाल्या नाहीत, असा आरोप प्रतापने केला आहे. तसेच लस घेतल्यानंतर प्लेटलेट्सची संख्या कमी होऊन अर्धी झाली आहे, असाही आरोप त्याने केला आहे. दरम्यान प्रताप चंद्रा यांनी एफआयआर दाखल केला नाही तर आपण कोर्टात जाऊ असा इशारा दिला आहे.
सोलापूरला वाली कोणीच नाही! लालफितीचं आता गळफास ठरू लागलीय (ब्लॉग)https://t.co/AdFGbFABlg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
लखनऊमधील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करणाऱ्या अॅण्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे निर्माण झाल्या नाहीत अशी तक्रार या व्यक्तीने केली आहे. लखनऊमधील आशियाना पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली आहे.
दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कारhttps://t.co/3vtrwdomFN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
तक्रारीत अदर पूनावाला यांच्याव्यतिरिक्त डीजीसीएचे संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मोहीम संचालक अपर्णा उपाध्याय तसंच इतरांची नावं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रताप चंद्रा यांनी ही तक्रार केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल रोजी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस त्यांनी घेतला होता. २८ दिवसांनी लसीचा डोस मिळणं अपेक्षित असताना त्यादिवशी दुसऱ्या डोसचा कालावधी सहा आठवड्यांनी वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यानंतर सरकारने हा कालावधी १२ आठवड्यांसाठी वाढवला.
गुजरातला 1 हजार कोटी, महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटेल तेवढे तरी द्या, रामदास आठवलेंना पवारांचा आणखी एक सल्ला https://t.co/ngphRxsK4t
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
पहिला डोस घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटत नव्हतं असं प्रताप चंद्रा यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांच्या वक्तव्याचा दाखला दिला, ज्यामध्ये त्यांनी कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात प्रतिपिंडे तयार होत असल्याचं म्हटल होतं. प्रताप चंद्रा यांनी सरकारमान्य लॅबमध्ये चाचणी केला असता त्यांच्या शरीरात करोनाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे तयार झाली नसल्याचं निष्पन्न झालं. उलट त्यांच्या प्लेटलेट्स तीन लाखांहून दीड लाखांवर आल्या होत्या.
5G विरोधात जुही चावला कोर्टात, दूरसंचार कंपन्यांनी स्पष्ट करावं https://t.co/KxZEfDJtdp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
लस घेतल्यानंतर आपल्या प्लेटलेटची संख्या निम्म्याने कमी झाली असून करोनाची लागण होण्याची शक्यता वाढली आहे, असा आरोप प्रताप चंद्रा यांनी केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली आहे, मात्र एफआयआर दाखल केलेला नाही. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याची माहिती देण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
रामदेवबाबांना विरोध, डॉक्टरांकडून आज काळा दिवस #black #day #surajyadigital #ramdevbaba #सुराज्यडिजिटल #Ramdev pic.twitter.com/xPfbxBE3rc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021