पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला टोमणा मारला आहे. ‘सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी हवी असेल, तर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना पत्र लिहितील, तिथे दिल्लीत मुलगी असेल तर बघा’ असा टोला त्यांनी लगावला. तसेच शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. फडणवीस यांनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली, असं त्यांनी सांगितलं.
बार्शीरोडवर ट्रक – छोटा हत्तीचा अपघात, दोन जागीच ठार नऊजण जखमी https://t.co/zguSJmcAcK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात भाष्य केले. राज्य सरकाकडून संभाजीराजे यांची हेरगिरी होत असल्याची बाब समोर आली आहे. मी याचा निषेध करतो. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
शिक्षणमंत्री पोखरियाल एम्स रूग्णालयात दाखल, बारावीच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडणार?https://t.co/3UXZ3bZS13
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रातील सरकार हे कोडगं आहे. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी खासदारकीचा राजीनामा दिला तर कोणावरही परिणाम होणार आहे का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
लस घेतल्यानंतर अँटीबॉडी बनल्याच नाहीत, पुनावालांविरोधात तक्रार https://t.co/GZSAw5XDTb
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. शरद पवार आजारी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये काहीही राजकीय नव्हते. आजदेखील देवेंद्र फडणवीस हे जळगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
* चंद्रकांत पाटलांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी पाटलांनी ‘आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील,’ अशी टीका केली होती. त्याला आता खुद्द आदित्य ठाकरेंनीच प्रत्युत्तर दिलंय. ‘चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात मी वेगळी चर्चा करेल. आता वातावरण चांगलं ठेवावं. तसेच, माझ्या लग्नाची एवढी चिंता का? असा सवाल आदित्य यांनी केला आहे.
दीड महिन्यापासून दीर करत होता भावजयीवर बलात्कारhttps://t.co/3vtrwdomFN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021