मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 28 वर्षीय महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. आणि त्याचा मृतदेह घरातील किचनमध्ये पुरला. रशीदा शेख असे आरोपी महिलेचे नाव आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहिसरमध्ये ही घटना घडली आहे. तिचा प्रियकर अमित मिश्रा फरार आहे. दरम्यान, आरोपींनी धारदार हत्याराने मुलांसमोरच पती रईस शेखचा गळा चिरला, असं पोलिसांनी सांगितले.
बारावीची परीक्षा रद्द, महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडून निर्णयाचे स्वागत https://t.co/qsnT4qMBhQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 1, 2021
मुंबईच्या पश्चिम उपनगरात दहीसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. रशीदा शेख असे आरोपी महिलेचे नाव आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. तिचा प्रियकर अमित मिश्रा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. हत्येची ही घटना १२ दिवसांपूर्वी घडली. आरोपींनी धारदार हत्याराने मुलांसमोरच पती रईस शेखचा गळा चिरला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रशीदा आणि अमितने रईसची हत्या केल्यानंतर किचनमध्ये मृतदेह पुरला व नेहमीसारखं जगणं सुरु केलं. रईस एका कपड्यांच्या दुकानात कामाला होता. २५ मे रोजी रईसच्या शेजाऱ्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. कारण आठवड्याभरापासून त्याने रईसला पाहिले नव्हते.
जपान चंद्रावर पाठवणार रूप बदलणारा रोबो https://t.co/keZX2ZNivo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
रईसचा भाऊ त्याच्या घरी आला. त्यावेळी पुतण्यांनी काकाला घडला प्रकार सांगितला व हा भयंकर गुन्हा उघडकीस आला. पोलीस सध्या किचनमध्ये दफन केलेला मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.