नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी ट्विटरवर सक्रिय असतात. राहुल यांनी मंगळवारी त्यांच्याच पक्षाचे काही नेते तसेच, पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. यात वायनाडच्या कार्यालयातले काही लोक आणि दिल्लीतील पत्रकारांचा समावेश आहे. ही राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा रंगतेय. मात्र, ही एक एक्सरसाइज असून राहुल यांचं अकाउंट रिफ्रेश केलं जात आहे. लवकरच काही जणांची यादी तयार होईल. ज्यांना राहुल फॉलो करतील अशी माहिती आहे.
महिला शास्त्रज्ञांची कमाल; प्रयोगशाळेत तयार केले आईचे दूध, येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल https://t.co/0iCEEAQ3d4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
काल मंगळवारी त्यांनी दिवसभरात अनेक नेते आणि पत्रकारांना ट्विटरवरून अनफॉलो केलं आहे. त्यात काँग्रेसचे नेते आणि काही जवळच्या पत्रकारांचाही समावेश आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ट्विटरवरून नेते आणि पत्रकारांना अनफॉलो करण्यामागच्या राहुल यांच्या या खेळीवर राजकीय विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात काँग्रेस नेत्यांचाही समावेश होता. एवढेच नव्हे तर वायनाड येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात काम करणाऱ्यांनाही अनफॉलो केलं गेलं.
महाराष्ट्र – पुढील 3 तासात मुसळधार पाऊस https://t.co/Y9ciMbkK8K
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
पक्षांच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, सध्या राहुल यांचं ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केलं जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की लवकरच एक यादी तयार केली जाईल. या यादीमध्ये ज्या लोकांना राहुल गांधी ट्विटरवर फॉलो करतील अशा लोकांची नावं असतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रक्रियेनंतर आत्ता अनफॉलो केलेल्या लोकांनाही राहुल फॉलो करु शकतात. राहुल यांची ही कृती त्यांच्या आगामी राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल ट्विटरवर बरेच सक्रिय आहेत. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर बरीच टीकाही केली आहे.
टेंभुर्णीचे पीआय राजकुमार केंद्रेंचा पदभार घेतला काढून, मातंग महिलांना विष्ठा उचलायला लावलेले प्रकरणhttps://t.co/lfqBE5EjEQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
राजकीय वर्तुळापासून ते सोशल मीडियापर्यंत एकच चर्चा सुरू झाली. मात्र, राहुल गांधी यांचं अकाउंट रिफ्रेश केलं जात आहे. त्यासाठी ही एक्सरसाईज असून लवकरच काही लोकांची यादी तयार केली जाणार आहे, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं. नव्या लिस्टमधील लोकांना राहुल गांधी फॉलो करतील. तसेच ज्या लोकांना अनफॉलो करण्यात आलं आहे, त्यापैकी काही लोकांना पुन्हा फॉलो केलं जाणार असल्याचंही काँग्रेसने स्पष्ट केलं.
एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, काहीतरी नक्कीच घडतंय https://t.co/rnhBoF6uhw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी हे ट्विटरवर आक्रमक आहेत. कोरोना काळात त्यांनी ट्विटरवरूनच सरकारवर निशाणा साधला आहे. तर विरोधकांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी कोविडला मोविड म्हटलं आणि मोदींवर थेट निशाणा साधला. तेव्हा त्यांचं ट्विटर अकाउंट वादात आलं होतं. ट्विटमधील भाषेवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. परंतु, कोरोनाची दुसरी लाट येण्यास केवळ मोदी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोविडला मोविड नाव देण्यात आल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं.
Full marks to #Movid. pic.twitter.com/7uiqYhYpf7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 30, 2021