Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: प्रश्न – कंत्राट कुणाला दिलं ? उत्तर – तुझ्या बापाला, महापौर वादात…!
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

प्रश्न – कंत्राट कुणाला दिलं ? उत्तर – तुझ्या बापाला, महापौर वादात…!

Surajya Digital
Last updated: 2021/06/03 at 5:04 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोना लसी विकत घेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर एकाने कंत्राट कुणाला दिलं? असं विचारलं. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या ट्विटर अकाउंटवरून ‘तुझ्या बापाला’ असे उत्तर दिले गेले. यामुळे पेडणेकर यांच्यावर मोठी टीका होत आहे. हे ट्विट डिलिट करण्यात आले आहे. तसेच आपण हे ट्विट केले नव्हते, एका कार्यकर्त्याने केले होते, असे पेडणेकर यांनी सांगितले.

भारतातील लोकांचं 'कंडोम' वापरण्याचं प्रमाण कमी, अहवालातील धक्कादायक खुलासेhttps://t.co/tVJ9YE3Sx7

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सध्या वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याचा बाप काढणं किशोरी पेडणेकर यांना चांगलंच महागात पडलं आहे. नेटकऱ्याने लसीसंदर्भात पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिलं. यानंतर सोशल मीडियावर किशोरी पेडणेकर ट्रोल होऊ लागल्या. अखेर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

The lady in below tweet is Mumbai Mayor @KishoriPednekar

When asked who got the Vaccination Contract in @mybmc

She answers "तुम्हारे बाप को "

This is an insult to all #Mumbaikars waiting for Vaccination #ShivSenaInsultsMumbaikars pic.twitter.com/nif3GztZi7

— Devang Dave (@DevangVDave) June 2, 2021

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता.

या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.

आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच, महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उत्पन्न वाढीसाठी देवाच्या प्रतिमा तयार करून विक्री
https://t.co/EBp7IewEJy

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021

महापौरांच्या या आक्षेपार्ह भाषेवर विरोधकांनीही आक्षेप नोंदवला आहे. “मुंबईच्या पहिल्या नागरिक असल्याने लोकांना त्यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी सुसंस्कृत भाषेची अपेक्षा आहे,” असं भाजपाचे नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटलं आहे. समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनीदेखील महापौरांनी आपल्या कार्यालयाचा मान राखला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.

ट्विटरवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू, असे करा व्हेरिफिकेशन https://t.co/cVQrnjTlIk

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #Q #whom #contract #awarded? #Answer #Yourfather #mayor #dispute ...!, #प्रश्न #कंत्राट #कुणालादिलं #उत्तर #तुझ्याबापाला #महापौर #वादात...!
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्विटरवर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू, असे करा व्हेरिफिकेशन
Next Article रणजितसिंह डिसले गुरुजींची कमाल, मोठी जबाबदारी मिळाली

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?