मुंबई : राज्यातील 18 जिल्ह्यांत उद्यापासून (4 जून) लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार आहे. आता औरंगाबाद, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, नाशिक, परभणी, नांदेड, ठाणे, वर्धा, यवतमाळ, भंडारा, लातूर, नागपूर, वाशिम, गोंदिया, गडचिरोली येथे पूर्ण व्यवहार सुरू होणार आहेत. लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांची परवानगी असणार आहे. पण जिल्ह्यानुसार यात बदल होऊ शकतो. तर थिएटर्स, कार्यालय, सलून, जिम, शूटिंग सुरू होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा परस्पर केली आहे. यावरुनही ट्वीटवर भाष्य केले जात आहे.
ते बहुतेक @NANA_PATOLE यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय @VijayWadettiwar यांनी खूपच मनावर घेतलेला दिसतोय, लगेच अमलबजावणी पण केली unlock ची #स्वबळावर घोषणा करून. 😀😀 https://t.co/yAO3FXYP1j
— नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) June 3, 2021
राज्य 15 एप्रिलपासून दुसऱ्या कोरोना लाटेमुळे लॉकडाऊन झालं आहे. मात्र, आता रुग्णांची संख्या कमी झाल्यानं राज्य अनलॉक च्या दिशने वाटचाल करत आहे. या संदर्भात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर बंदच, महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, उत्पन्न वाढीसाठी देवाच्या प्रतिमा तयार करून विक्री
https://t.co/EBp7IewEJy— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
आज पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने राज्यातील 18 जिल्ह्यात अनलॉक जाहीर केलं आहे. त्यानुसार या जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनच्या नियमांना शिथिलता दिली आहे. परभणी,ठाणे, वर्धा, वाशिम,यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली गोंदिया जळगाव, जालना लातूर नागरपूर नांदेड नाशिक या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात येत आहे. या जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के असून या जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यामुळं या जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रश्न – कंत्राट कुणाला दिलं ? उत्तर – तुझ्या बापाला, महापौर वादात…! https://t.co/2mNBc3ylxN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 लेव्हल ठरवल्या आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील. राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत 5 टप्पे ठरविण्यात आले असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष यावरुन हे 5 टप्पे ठरवण्यात आले आहेत.
निकषानुसार मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई शहरात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार नाही. मुंबईत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी अद्यापपर्यंत लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
रणजितसिंह डिसले गुरुजींची कमाल, मोठी जबाबदारी मिळाली, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छाhttps://t.co/HwrsP8REBD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
* 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवला जाणार
– पहिला टप्पा- औरंगाबाद, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, नाशिक, परभणी, नांदेड, ठाणे, वर्धा, यवतमाळ, भंडारा, लातूर, नागपूर, वाशिम, गोंदिया, गडचिरोली
– दुसरा टप्पा – मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार, या ठिकाणी कलम 144 लागू राहील.
– तिसरा टप्पा – अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा,
– चौथा टप्पा – पुणे व रायगड
– पाचवा टप्पा – ‘रेड झोन’ मधील उर्वरित जिल्हे.
World Bicycle Day 2021: सायकलिंगचे 'हे' आहेत फायदे #surajyadigital #जागतिक #WorldBicycleDay #सायकलदिन #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nViOI8g3kU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021