नवी दिल्ली : मोदी सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा एकदा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आता हा नवीन संघर्ष ट्विटर अकाउंटवरून ‘ब्ल्यू टिक’ काढून टाकण्यावरून होण्याची शक्यता आहे. शनिवारी सकाळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवल्यानंतर आता आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे खातेही अनव्हेरिफाय करण्यात आलं आहे. मात्र, व्यंकय्या नायडू यांच्या खात्याची दोन तासांनंतर पुन्हा व्हेरिफाय झाले. परंतु संघ प्रमुखांसह आरएसएसच्या अनेक नेत्यांच्या खात्यातून ब्ल्यू टिक हटवली आहे.
सकाळी व्यंकय्या नायडू यांच्या अकाउंट व्हेरिफिकेशनवरून वाद झाला असता ट्विटरवरुन स्पष्टीकरणात असे म्हटले गेले होते की, खाते लॉग इन झाल्यापासून ६ महिन्यांहून अधिक काळ झाला होता, ज्यामुळे टिक हटवली गेली.
कोरोनाविरुद्धचे 'युद्ध' जिंकणार, धारावीत फक्त 'एक' रुग्ण आढळला https://t.co/S6ExPcDITZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021
ट्विटरच्या नियमांनुसार एखाद्या खात्याचं नाव बदललं गेलं असेल किंवा एखादं अकाउंट सक्रिय नसेल किंवा अपडेट होत नसेल, तर ते अनव्हेरिफाइड केलं जातं आणि ‘ब्लू टिक’ही हटवली जाते. दुसरी गोष्टी म्हणजे एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या ट्विटर हॅण्डलसमोर ब्लू टिक असेल मात्र नंतर त्यानं कार्यालय सोडल्यास आणि व्हेरिफिकेशनचे निकष पूर्ण केले जात नसतील तर ब्लू टिक हटवली जाते. उपराष्ट्रपती झाल्यापासून व्यंकय्या नायडू हे उपराष्ट्रपतींच्या हॅण्डलचाच वापर करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलचा वापर होत नसल्यामुळे ब्लू टिक काढून टाकण्यात आली असावी, असं सांगितलं जात आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचे आदेश https://t.co/XHwgURhYZf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
मोहन भागवत यांच्या खात्यातूनही हटविण्यामागील हेही कारण असू शकते. मोहन भागवत यांचे ट्विटर अकाउंट मे २०१९ मध्ये तयार केले गेले होते, परंतु सध्या त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एकही ट्विट दिसत नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोहन भागवत यांच्यानंतर आरएसएसच्या अनेक बड्या नेत्यांची खातीही ट्विटरद्वारे अनव्हेरिफाय केली गेली आहेत. यामध्ये सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.
ट्विटरच्या नियमात असे म्हटले आहे की गेल्या सहा महिन्यांत लॉग इन करणे आवश्यक आहे, तरच ते ॲक्टिव्ह खाते म्हणून समजले जाईल. तथापि, आपण ट्विट, रिट्वीट, लाइन, फॉलो, अनफॉलो करणे आवश्यक नाही. परंतु खाते चालू ठेवण्यासाठी सहा महिन्यांत एकदा लॉग इन करणे आवश्यक आहे आणि प्रोफाइल अपडेट करणे आवश्यक आहे.
महाविकास आघाडीचा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊनचे निर्बंध
https://t.co/iSVF3cgOZW— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
* चूक दुरुस्त
देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ‘ब्लू टिक’वरून शनिवारी बराच गोंधळ उडाला. मायक्रोब्लॉगिंक वेबसाईट असलेल्या ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक अकाऊंटवरील ब्लू टिक (अकाऊंट विश्वसनीय असल्याचं सांगणार निळ्या रंगाचं चिन्हं) काढून टाकली होती. मात्र, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर ब्लू टिक पुन्हा देण्यात आली आहे.
खात्रीशीर, विश्वसनीय आणि सक्रिय असलेल्या ट्विटर खात्याबद्दल इतर वापरकर्त्यांना आश्वस्त करण्यासाठी ट्विटरकडून ब्लू टिक अर्थात ब्लू व्हेरीफाईड बॅच दिला जातो. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वैयक्तिक ट्विटर खात्यालाही ब्लू टिक देण्यात आलेला आहे.