मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यात दाखल झाला आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने याची माहिती दिली.
Significant Weather Features dated 05-06-2021 are:
♦ Southwest Monsoon has further advanced into more parts central Arabian Sea, entire coastal Karnataka, Goa, some parts of Maharashtra, most parts north Interior Karnataka,— India Meteorological Department (@Indiametdept) June 5, 2021
केरळमधून वेगवान वाटचाल करत मान्सूनने महाराष्ट्रात धडक दिली आहे. यंदा हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाच्या ५ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सूनच्या आगमनाच्या वृत्ताने बळीराज सुखावला आहे.
‘मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला. मान्सून रेषा राज्यात द.कोकणात हर्णेपर्यंत तसंच द.मध्य महाराष्ट्रात सोलापूरपर्यंत आहे. मराठवाड्याचा काही सलग्न भाग असून परिस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकूल आहे,’ अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मान्सून महाराष्ट्रात १० जूनला दाखल होईल, असा अंदाज याआधी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मात्र ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर दोन ते दिवसात मान्सूनचं आगमन होईल, असं सांगितलं गेलं. मात्र वेगवान प्रवास करत आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला.
चांगली बातमी मान्सूनची ..🌧🌧🌧
मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.
मान्सून रेषा राज्यात, द.कोकणात हर्णे पर्यंत, द.मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाडा काही सलग्न भाग…
परीस्थिती पुढच्या वाटचालीसाठी अनुकुल..
IMD pic.twitter.com/L4ZmSbFlrb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 5, 2021
यंदा देशभरात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील विविध भागात वेळेच्या आधीच मान्सूनचं आगमन झालं. आतापर्यंत गोवा, महाराष्ट्रातील काही भाग, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग, तामिळनाडू या भागांमध्ये मान्सूनने धडक दिली आहे.
मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार, शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस महत्त्वाचा https://t.co/c9iJDvasSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
दरम्यान, कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अर्थव्यवस्थेची मदार ही कृषी क्षेत्रावर अधिक असणार आहे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे कृषी अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे.
खेळाडूंना 1,60,000 मोफत 'कंडोम', पण वापर करण्यास मनाई https://t.co/fTg3VXo8yd
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021